Shivsena: श्रीकांत शिंदेंनी कान टोचूनही अंबरनाथमध्ये गटबाजी सुरुच,वाचा वर्धापनदिनी काय घडले

Ambarnath: दोन गटांच्या आजूबाजूला लागलेल्या बॅनरमध्ये एकमेकांचे फोटो नाहीत!
Shivsena: श्रीकांत शिंदेंनी कान टोचूनही अंबरनाथमध्ये गटबाजी सुरुच,वाचा वर्धापनदिनी काय घडले
Shivsena ambarnath sakal
Updated on

Shrikant Shinde: निमित्ताने शहरात लागलेल्या बॅनर वरून अंबरनाथ मध्ये असलेली शिवसेनेतील गटबाजी उघड दिसून आली आहे.

या गटबाजीवरून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यनाचे सुपुत्र तसेच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तसेच दोन्ही गटांचे कान देखील टोचले होते. मात्र त्यानंतरही शिवसैनिकांतील गटबाजी कमी झाल्याचे दिसून येत नाही.

Shivsena: श्रीकांत शिंदेंनी कान टोचूनही अंबरनाथमध्ये गटबाजी सुरुच,वाचा वर्धापनदिनी काय घडले
CM Eknath Shinde : ट्रकची नोंदणी असलेल्या व्हिंटेज कारमधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सवारी; नेमका प्रकार काय?

अंबरनाथ शहरात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे दोन गट असून आजवर अनेकदा या गटबाजीचं उघडपणे प्रदर्शन झालं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही याच गटबाजीमुळे सर्वाधिक विकासकामं करूनही अंबरनाथ शहरातून शिवसेनेला अवघ्या 35 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः अंबरनाथ शहरात येऊन पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती.

Shivsena: श्रीकांत शिंदेंनी कान टोचूनही अंबरनाथमध्ये गटबाजी सुरुच,वाचा वर्धापनदिनी काय घडले
CM Eknath Shinde : ट्रकची नोंदणी असलेल्या व्हिंटेज कारमधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सवारी; नेमका प्रकार काय?

मात्र याला आठवडाही उलटला नसताना पुन्हा एकदा वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्समधून गटबाजी समोर आली आहे. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अगदी बाजूबाजूला दोन्ही गटांनी बॅनर्स लावले असून त्यावर एकमेकांचे फोटो मात्र टाकलेले नाहीत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा या गटबाजीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता 3 महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत या गटबाजीचा पक्षाला फटका बसू नये, यासाठी वरिष्ठांनी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त होतेय.

Shivsena: श्रीकांत शिंदेंनी कान टोचूनही अंबरनाथमध्ये गटबाजी सुरुच,वाचा वर्धापनदिनी काय घडले
Praniti Shinde : खासदार प्रणिती शिंदेंकडून अपेक्षा वाढल्या; रेल्वे, पाणी, पीक विमासह घरकुलाचे प्रश्न सोडवण्याची आशा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.