पालघरमध्ये ना मोठा नेता, ना आमदार-खासदार तरीही ठाकरेंची शिवसेना ४ लाख पार; विधानसभेची गणिते बदलणार?

Palghar Lok Sabha Election Result : पालघर मतदार संघात लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या फुटीनंतर एकही मोठा नेता अथवा पक्षाचा चेहरा सेनेकडे नव्हता.
 Shivsena ubt got more than 4 lakh votes in Palghar Lok Sabha Election analysis assembly election  marathi news
Shivsena ubt got more than 4 lakh votes in Palghar Lok Sabha Election analysis assembly election marathi news
Updated on

विरार : पालघर लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी आणि महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. या ठिकाणी शिवसेनेकडे ना मोठा नेता होता, ना आमदार-खासदार, त्यात पक्षाचे नाव गेलेले, चिन्हही गेले होते अशा परिस्तितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भरती कामडी यांनी भाजप आणि ३ आमदार असलेल्या बविआला टक्कर देत मतदार संघात चार लाखाच्या वर मते घेऊन विरोधकांना धक्के देण्याचे काम केले आहे. यावेळी विधान सभेला महाविकास आघाडी एकजुटीमुळे पालघरमध्ये वेगळा इतिहास रचला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पालघर मतदार संघात लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या फुटीनंतर एकही मोठा नेता अथवा पक्षाचा चेहरा सेनेकडे नव्हता. परंतु या ठिकाणचे नेते गेले असले तरी शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंच्या मागे ठाम पणे उभे होते. याच झलक ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आली होती.

पालघर जिल्ह्यात सगळ्यात जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. तर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने (शिवसेनेने) सर्वात अगोदर आपला उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली होती. शिवसेनेला देशातील मोठा पक्ष भाजप आणि दुसऱ्या बाजूला पालघरमध्ये ज्यांच्याकडे तीन आमदार आहेत अशा बविआ बरोबर लढायचे होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकही आमदार अथवा खासदार याठिकाणी नव्हता. तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिद्द हरली नाही आणि एक वेगळा इतिहास लिहिला गेला.

 Shivsena ubt got more than 4 lakh votes in Palghar Lok Sabha Election analysis assembly election  marathi news
Hitendra Thakur: बहुजन विकास आघाडीला आत्मचिंतनाची गरज; पालघर मध्ये सलग चौथा पराभव

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या बरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही युती धर्म पाळत जीवाचे रान केले आणि भारती कामडी यांना मतदार संघात ४ लाख १७ हजार ९३८ मते मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. याठिकाणी शिवसेनेचा पराभव झाला असला तरी विधानसभेच्या सहाही मतदार संघात सेनेला मिळालेल्या मतांनी महाविकास आघाडीला बळ मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे यांची सेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडी यांच्या समोर महाविकास आघाडी मोठे आव्हान निर्माण करणार हे मात्र खरे.

 Shivsena ubt got more than 4 lakh votes in Palghar Lok Sabha Election analysis assembly election  marathi news
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प कधी सादर करणार? समोर आली महत्वाची अपडेट

विधान सभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आता आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पालघरमध्ये महायुतीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोल हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे उरलेल्या चार जगावर शिवसेना आपली पकड मजबूत करण्याची तयारी करत असल्याने यावेळी प्रथमच पालघरमध्ये विधानसभेला सहाही मतदार सांगत चुरस पाहायला मिळेल. सहा विधानसभा मतदार संघात भाजपचे डॉ. हेमंत सावरा आणि शिवसेनेच्या भारती कामडी यांच्यात काही हजार मतांचा फरक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.