मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे.
शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदेगटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भादवी कलम १५३(अ),१५३ (ब),१५३(अ)(१)सी, २९४, ५०४,५०५(१)(क) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.