Vidhansabha Election : कल्याण पश्चिमेत मशाल तळपणार... शिंदेंच्या शिवसेनेतून ठाकरेंकडे गेलेल्या नेत्याचा कल्याण पश्चिमेवर दावा

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुक तोंडावर आली असताना इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
Assembly Election
Assembly Election
Updated on

डोंबिवली, ता. 9 - विधानसभा निवडणुक तोंडावर आली असताना इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाकडून तिकीट मिळाल्यास कल्याण पश्चिमेत नक्कीच मशाल तळपणार असा विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार साईनाथ तारे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. तारे यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळेल असा दावा देखील त्यांनी केला आहे. तारे यांनी काही

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महायुती आणि महविकास आघाडी सरकार जागा वाटपांच्या चर्चेत व्यस्त आहेत. दोन्ही सरकारकडून अद्याप जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी इच्छुक उमेदवारांकडून मात्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटातून उध्दव ठाकरे गटात प्रवेश केलेल्या साईनाथ तारे यांनीही कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. बुधवारी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तारे म्हणाले, पक्ष प्रवेश करतेवेळी उध्दव ठाकरे यांनी आपल्याला कल्याण पश्चिम विधानसभेतून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले असून आपला त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचेही साईनाथ यांनी यावेळी स्पष्ट केले.

Assembly Election
Pune Accident : रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला डंपरने चिरडले, कोथरूडमध्ये भीषण अपघात

तसेच आपण ही निवडणूक रोजगार निर्मिती, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून अन्यायकारक कर घेऊनही दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या सुविधा अशा प्रमुख मुद्द्यांवर लढणार आहे. इथल्या लोकांसाठी आपण अधिकाधिक चांगले काम करण्याचा 100 टक्के प्रयत्न करू आणि आपल्याला विश्वास आहे की या निवडणुकीत कल्याण पश्चिमेत मशालच तळपेल असा ठाम विश्वासही तारे यांनी यावेळी व्यक्त केला.

Assembly Election
Jammu Kashmir: दोन जवानांचे दहशतवाद्यांकडून अपहरण, गोळी लागलेली असताना एकजण तावडीतून निसटला; दुसऱ्या जवानाचा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.