मुंबई- उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या काळात आम्ही सक्षमपणे लढा दिला. पण, सरकार बदललं आणि आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी नांदेड, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर मधील रुग्णांच्या मृत्यूचा उल्लेख केला.
विषय रोज नवीन नवीन आहेत. काही विषय खूप वर्षांपासून तसेच्या तसे आहेत. आज मी जरा अस्वस्थ आहे. सध्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेत, ते बघितल्या नंतर चीड येते. आज मी मुख्यमंत्री नाहीये, मविआ सरकार नाहीये. आरोग्य व्यवस्था तीच आहे. कोरोना सारख्या संकटाचा सामना केला. त्याच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
गोव्यामध्ये टेबलवर नाचायला पैसे आहेत, गुवाहटीमध्ये मजामस्ती करायला पैसे आहेत, पण औषधासाठी पैसे नाहीत का ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. एक फूल दोन हाफ कुठे आहेत. सरकारकडे औषधांसाठी पैसे नाही म्हणता, पण परदेश दौरा सुरु आहे, जाहीरातबाजी करण्यासाठी सरकारकडे पैसे कुठून येतोय, असा थेट सवाल त्यांनी केला.
कोरोना काळात सरकारने योग्य काम केले. आम्ही दुर्गम भागात औषधे पुरवलीत. ड्रोन ने दुर्गम भागात औषधे पुरवली. मी देखील दुर्गम भागात भेट दिली होती. अनेक डॉक्टर नर्सचा मृत्यू कोरोनाशी लढताना झाला. आज त्यांना बदनाम केलं जातंय. अनेक ठिकाणी दुर्घटना घडताहेत, मुख्यमंत्री कुठे आहेत. एक फुल दोन हाफ कुठे आहेत? मुख्यमंत्री दिल्लीत आहे. एक फुल एक हाफ दिल्लीत आहेत दुसरा हाफ कुठे आहे? असा खोचक टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री शिंदे सध्या दिल्लीत आहेत. नक्षलवाद विरोधात कसा लढायचं यासाठी ते तेथे आहेत. ते पण महत्वाचं आहे. पण आता ज्या घटना घडल्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी जायला हवं. नांदेड मध्ये डीन वर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मग फक्त नांदेड मध्येच का? ठाण्यात देखील घटना घडली. मग तिथे का नाही कारवाई केली, असा सवाल त्यांनी केला.
नांदेडच्या डीनला एका खासदाराने शौचालय साफ करायला लावलं. त्याच्यावर अट्रोसिटी गुन्हा दाखल झालाय. पण, नांदेड मध्ये डीन वर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा दाखल केलाय का, असा प्रश्न ठाकरेंनी विचारला.
औषधे खरेदी केली जात नाहीये. औषधांचा तुटवडा असल्याचं सांगितलं जात आहे. यामागे कोण आहे? कोरोना काळात औषधांचा तुटवडा नव्हता मग आता कसा तुटवडा पडतोय. सगळा भ्रष्टाचार सुरू आहे. औषधे खरेदी केली जात नाही आहेत. जो आरोग्यमंत्री हाफकीन कोण असं विचारतो त्याचबद्दल काय बोलणार, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.