डोंबिवली - शिवसेना उध्दव बाळासाहेर ठाकरे पक्षात आणखी एक नाराजीचा सूर उमटला आहे. कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी उपनेतेचा पदाचा राजीनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाकडून कल्याणमधील पदे देताना, संघटनात्मक बाबी आणि सचिन बासरे यांना उमदेवारी देताना आपणास विश्वासात घेतले नाही. या सगळ्या घाणेरड्या राजकारणामुळे व्यथित होऊन आपण राजीनामा देत आहोत, असे ज्येष्ठ शिवसैनिक विजय साळवी यांनी पत्रात म्हटले आहे.