मोदींची काळाराम मंदिर भेट; उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या आधी गेलात, आता आणखी एक काम करा!

भाजपला त्यांच्या ढोंगामुळे आपण सोडलंय. मिंधे मंदिर साफ करताहेत पण आता आपल्याला त्यांना साफ करायचंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
shivsena uddhav thackeray
shivsena uddhav thackeray
Updated on

मुंबई- सर्व देशभक्त एकत्र झालेत, सर्व पक्ष आज एकत्र आलेत. आपलं हिंदुत्व बेगडी नाही. आपण हिंदुत्व सोडू शकत नाही. भाजपला त्यांच्या ढोंगामुळे आपण सोडलंय. मिंधे मंदिर साफ करताहेत पण आता आपल्याला त्यांना साफ करायचंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलत होते. (shivsena uddhav thackeray speech dombivli rally criticize bjp narendra modi)

काही ठिकाणी भिंतीवर सरकारी जाहिराती लागल्या आहेत. मतदानाचा अधिकार वापरा असं ऐका बाजूला लिहिलंय आणि दुसऱ्या बाजूला कचरा साफ करा असं लिहिलंय. हे खूप अर्थपूर्ण आहे, असं म्हणत त्यांनी सरकारला टोमणा मारला.

राम मंदिराचा लढा गेल्या शतकांचा आहे. अनेक कारसेवकांनी आपलं रक्त सांडलय. हे राम मंदिर बांधताहेत म्हणून राम धर्तीवर आलेत असं त्यांना वाटतंय. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे खरे विचार होते. त्यांचे राम मंदिराच्या लढ्यात योगदान होते. अटल बिहारींचा जो भाजप होता त्यांच्यासोबत आमची युती होती. त्यांनी विचार सोडलेत, दलाली विचाराचे हिंदूत्व मला मान्य नाही, अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली.

shivsena uddhav thackeray
Nashik News : ‘उद्धव ठाकरेंच्या इगोमुळे महाराष्ट्र विकासात मागे’ : चंद्रशेखर बावनकुळे

आणखी एक काम करा!

राम मंदिर देशाचा धार्मिक सोहळा आहे. तेव्हा राष्ट्रपतींच्या हातून उद्घाटन आवश्यक होते. सोमनाथाच्या मंदिराच्या उद्घाटनावेळी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना बोलावलं होतं, त्याप्रमाणे आताही राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला काय हरकत आहे. मी काळाराम मंदिराला जाणार आहे, त्याआधी पंतप्रधान मोदी गेले. आता मी शिवनेरीला जाण्याचं ठरवलं आहे. 22 तारखेच्या आधी शिवनेरीला जाणार आहे, आता मोदी माझ्या आधी तेथे जातात हा हे मी पाहणार आहे, असं ठाकरे म्हणाले.

काल पंतप्रधान मोदी यांनी अटल सेतूचे लोकार्पण केले. शिवडी ते न्हावाशिवा अंतर कमी करण्यासाठी हा रस्ता आहे. त्यावरुन ते एकटेच चालत होते. एकाचाच फोटो, अटल बिहारी वाजपेयींचा देखील फोटो नव्हता. जाहिरातीमध्ये देखील फोटो नाही. मी आपल्या साक्षीने सांगतो. राष्ट्रपती आल्या तर राम मंदिर आणि गोदावरीच्या आरतीत त्यांच्या एकट्याचा फोटो येईल. आमचा कुणाचाही येणार नाही, असं ते म्हणाले.

shivsena uddhav thackeray
MLA Disqualification Uddhav Thackeray : नार्वेकरांचा निकाल विरोधात पण तरीही ठाकरेंना फायदा! उद्धव ठाकरे मॅजिक दाखवणार?

राम मंदिर कोर्टाचा निकाल!

राम मंदिर विषय थंड बसत्यात गेला होता. मी शिवजन्म भूमीची माती घेऊन अयोध्येला गेलो होतो. मी राम मंदिरात गेल्यानंतर मंदिराचा निकाल एका वर्षात लागला होता. माना अथवा न माना. पण, माझी ही श्रद्धा आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. नंतर मंदिर झालं आहे, असं ठाकरे म्हणाले. तुम्ही माझं चोरलेलं धनुष्य बाण घेऊन उभे राहा आम्ही मशाल घेतो.. होऊन जाऊदे, असं आव्हान त्यांनी केलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.