सेनेचा रात्रीतून मोठा निर्णय, काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर मतांचा कोटा बदलला

sanjay raut and nana patole | MLC Election 2022 News
sanjay raut and nana patole | MLC Election 2022 News
Updated on

मृणालिनी नानिवडेकर / सकाळ न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक लागल्यानंतर राजकीय डावपेचांना वेग आला आहे. काही वेळात मतदान पार पडणार असलं, तरीही रात्रभर चालेल्या बैठकांमुळे ऐनवेळी बाजी पटली होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. भाजपने संख्याबळ कमी असतानाही पाचवा उमेदवार उतरवण्यावर शिक्कामोर्तब केलं. गुप्त मतदान असल्याने भाजपला जास्त मतदान होण्याची शक्यता फडणवीसांनी व्यक्त केली होती. यामुळेच भाजपने निवडणुकीसाठी आत्मविश्वास दाखवला.

दरम्यान, मविआच्या उमेदवारांचा कोटा मुख्यमंत्री ठरवणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, शिवसेनेकडे अतिरिक्त मतं असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी त्यांची मतं मिळण्याबाबत अनिश्चितता आहे. (MLC Election 2022 Updates)

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पहाटे खलबतं झाली. अतिरिक्त मतं देणार नसाल तर राज्य सरकार धोक्यात येईल, असा निर्वणीचा इशारा काँग्रेसने दिलाय. सेनेला केंद्राच्या मर्जीत तर रहायचे नाही ना? अशी थेट थेट विचारणा झाली असून यामुळे मविआतील मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता वाढली आहे.

sanjay raut and nana patole | MLC Election 2022 News
मविआतील पहिला आमदार फुटला? फडणवीसांची खेळी यशस्वी

शिवसेनेकडे अतिरिक्त मते असतानाही ती हस्तांतरीत करण्याचा विचार नसेल, तर आमचा उमेदवार पडेल. अन् महाराष्ट्र विकास आघाडी सरकार त्यामुळे धोक्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा कॉंग्रेसने रात्रभर चाललेल्या चर्चांनंतर दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत अप्रत्यक्ष 'कमळबळ' मिळावे यासाठी बाण जरा बोथट होत आहेत की काय, असा थेट प्रश्नही कॉंग्रेसने केला आहे. विधानसभेच्या अध्यक्षाची निवड सतत पुढे ढकलली जाते आहे. शक्य असूनही मतं दिली जात नाहीत. हा प्रकार आहे तरी काय अशी संतप्त विचारणा पहाटे काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रात्री उशिरा 1 वाजता अशोक चव्हाणांना फोन केला. यावेळी त्यांनी सेनेची अधिकची मतं काँग्रेसला देणार असल्याचं म्हटलंय. शिवसेनेकडील अधिकची मतं कोणाला जाणार याबद्दल स्पष्टता नव्हती. मात्र आता 4 ते 5 मतं सेनेतर्फे काँग्रेसला मिळणार आहेत. शिवसेनेकडे एकूण 55 आमदार आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनच्या 2 उमेदवारांना प्रत्येकी 26 मतं आवश्यक आहेत. त्यानुसार, 58 मतं शिवसेनेच्या दोन आमदारांसाठी खर्ची होणार आहेत. मात्र, शिवसेनेकडे अपक्षांची अतिरिक्त असेलली मतं आता काँग्रेसच्या वाट्याला येणार आहेत. यामध्ये सात मतं हक्काची आहेत.

मुंबई मनपासाठी सेनेची भाजपशी जवळीक?

मविआचा एकही उमेदवार पडला तरी तो त्या पक्षाचा नव्हे तर आघाडीचा पराभव असेल असे कॉंग्रेस परोपरीने सांगत होती. भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आल्यावर ते आक्रमक होतील, हे लक्षात घ्या असे सांगितले गेले. त्यावर कोणतेही आश्वासन न मिळाल्यावर अखेर मुंबई महापालिका निवडणूक सोपी जावी यासाठी सेना केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपची मर्जी तर राखू पहात नाही, ना असा टोकदार प्रश्न कॉंग्रेसने केला.

शेवटी ठरलं.... चार मतं काँग्रेसला देणार!

मध्यरात्री उशीरापर्यंत हा बैठक सिलसिला सुरू होता.अरविंद सावंत सेनेचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.अजितदादा पवार यांनीही कॉंग्रेसतर्फे मनधरणी सुरु ठेवली होती. त्यातच राज्यसभेत सेना उमेदवाराला इजा पोहोचवण्याची आमची शक्तीच नव्हती, हे कॉंग्रेसने लक्षात आणून दिले. भाजप थेट राहुल गांधींना ईडीच्या माध्यमातून गांजत असताना ज्या वैचारिक मित्र नसलेल्याला मुख्यमंत्री केले, त्यांचा पक्ष एवढेही ऐकणार नाही का असा प्रश्न केला गेला.

अखेर एकजिनसीपणा नसेल तर तो मुख्यमंत्री तसेच मविआचा पराभव असेल अशी कॉंग्रेसची भूमिका उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली गेली. सरकार अभंग अन एकजुटीचे आहे हे दाखवण्यासाठी मते देऊ अशी रदबदली अरविंद सावंत यांनी यशस्वीपणे केल्याचे समजते. त्यामुळे आता सेना ४ मते कॉंग्रेसकडे वळवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.