Shivsena Rebel: भुजबळांनी पक्ष सोडू नये म्हणून बाळासाहेबांनी कोणते प्रयत्न केले होते?

छगन भुजबळांनी बंड केलं आणि पहिल्यांदाच शिवसेना फोडली होती..
chagan bhujbal balasaheb thackeray
chagan bhujbal balasaheb thackerayesakal
Updated on

शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath shinde rebel) यांच्या बंडामुळे राज्यभरात वातावरण पेटलं आहे. महाविकास आघाडी विरोधात जवळपास चाळीसहुन अधिक आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटी मध्ये तळ ठोकून आहेत. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शिवसेनेचे मोजकेच आमदार शिल्लक राहिले असल्याच चित्र उभं आहे. दोन्ही बाजुंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकनाथ शिंदे हे स्वतःचा सवतासुभा उभा करतील अशी शक्यता असली तरी शिवसेनेकडून त्यांच्या गटातील आमदारांना समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न सुरु आहे.( (Maharashtra Politics Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray)

शिवसेनेत एवढं मोठं बंड होण्याची ही पहिली वेळ नाही.

खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बंड करून शिवसेना फोडण्याची कामगिरी सर्वप्रथम छगन भुजबळ यांनी करून दाखवली होती. ऐंशीच्या दशकात छगन भुजबळ हे सेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जायचे. त्याकाळात विधानसभेत सेनेचे ते एकमेव आमदार होते मात्र तरीही विरोधी बाकांवरून भुजबळांनी शिवसेनेची भूमिका कणखरपणे बजावली आणि तत्कालीन काँग्रेस सरकारला सळो की पळो करून सोडले.

तो काळ मंडल आयोगाच्या आंदोलनाचा होता. ओबीसी आरक्षणावर बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या काही भूमिकांमुळे छगन भुजबळ शिवसेनेवर नाराज होत गेले. काँग्रेसचे नेते असणाऱ्या शरद पवार (sharad pawar )यांच्याशी त्यांचं जवळकीच नातं निर्माण झालं. भुजबळांच्या नाराजीला पवारांनी बळ दिलं आणि यातूनच १९९१ सालच्या नागपूर अधिवेशनावेळी भुजबळांनी शिवसेनेतील १८ आमदारांना घेऊन बंड पुकारले.

chagan bhujbal balasaheb thackeray
जीवाशी खेळून शिवसेना सोडली, छगन भुजबळांनी सांगितली आठवण

शिवसेनेत यापूर्वी बंड हा शब्द देखील उच्चारणे गुन्हा होता. छगन भुजबळांना गद्दार म्हणून घोषित करण्यात आलं. त्यांना जीव वाचवण्यासाठी काँग्रेस आमदारांच्या संरक्षणाखाली लपून राहावे लागले. तरी देखील शिवसेनेचे ६ आमदार परतले आणि भुजबळांनी १२ आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली भुजबळांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं. (chagan bhujbal)

त्यानंतर कित्येक वर्षे छगन भुजबळ आणि शिवसेना यांच्यातील नाते टोकाचे राहिले. बाळासाहेबांनी त्यांना लखोबा लोखंडे ही उपमा दिली होती तर भुजबळ त्यांना टी बाळू हे संबोधन दिलं होतं. असे कटू वातावरण होते तरीही एकदा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी बाळासाहेबांना त्यांच्या मुलाखती मध्ये भुजबळांसंबंधी प्रश्न विचारला होता.

संजय राऊत बाळासाहेबांना म्हणाले होते की, सेनेत फूट पडू नये, भुजबळ जाऊ नये यासाठी तुमची काय भूमिका होती?

यावर शिवसेनाप्रमुखांचं उत्तर होतं,

"भूमिका म्हणजे? ज्याप्रकारे डाव रचले गेले ते दळभद्री होते. त्याला एकदा मी बोललो होतो. तुम्ही शरद पवारला भेटलात हे खरं आहे काय? तर म्हणतो कसा, शरद पवार दिल्लीमध्ये... मी इकडे, पण दिल्लीत जाऊन भेटला हा. हे काँग्रेसमधल्या एका जबाबदार माणसाने सांगितलंय मला. या तारखेला ते शरद पवारला दिल्लीत जाऊन भेटले. या तारखेला बारामतीत जाऊन आणि हया तारखेला मुंबईत भेटलेले आहेत. तीन भेटी झालेल्या आहेत शरद पवारांच्या त्याच्याबरोबर. तरीसुद्धा तो माणूस नाटकीपणानं मला सांगतोय, कसं शक्य आहे साहेब हे?"

chagan bhujbal balasaheb thackeray
एकनाथ शिंदेंचा आता शिवसेनेवर दावा? थेट मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान

बाळासाहेब या मुलाखतीमध्ये सांगतात की डिसेंबरच्या चार तारखेला छगन भुजबळ मुंबईला येऊन मला भेटणार होते पण आले नाहीत. अज्ञातवासात गेले. नागपूरमध्ये असलेल्या शिवसेना नेत्यांना देखील हे कळले नाही.

छगन भुजबळांनी नंतर भूमिका मांडली की 'सेनाप्रमुखांनी माझ्याशी संपर्कच ठेवला नाही.

बाळासाहेब म्हणतात संपर्क कसा ठेवणार? मला माहीतच नाही तू अज्ञातवासात कुठे आहेस तो.

छगन भुजबळ अज्ञातवासात गेल्यावर त्यांना बोलावलंही होते आणि ते निघालेही होतं. शिवसेनाप्रमुखांना त्यांनी निरोप दिला होता की , 'साहेब मी सगळं सोडून देतो."

बाळासाहेब सांगतात, मी म्हटलं नाही, तुला मोकळा करायचा का नाही हा माझा निर्णय आहे. तुला तसा मोकळा करता येणार नाही. हे पद मी तुला दिलेलं आहे. लोकांनी तुला निवडून दिलेलं आहे. शिवसेनेच्या नावावर तू इकडे ये, आपण बोलू.

बाळासाहेब ठाकरे सांगतात त्याप्रमाणे छगन भुजबळ यांना थांबवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले गेले मात्र ते थांबले नाहीत आणि शिवसेनेतील पहिलं बंड घडलं.

chagan bhujbal balasaheb thackeray
माझ्याकडे ५० हून अधिक आमदार; एकनाथ शिंदेंचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.