Raj Thackeray: राज ठाकरेंच्या वाढदिवशीच मनसेला धक्का, निष्ठावान पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Ulhasnagar : वरिष्ठांच्या दुर्लक्षतेमुळे हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचा आरोप पक्षप्रवेश करणाऱ्यांनी केला आहे.
 राज ठाकरेंच्या वाढदिवशीच मनसेला धक्का, निष्ठावान पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Raj Thackeraysakal
Updated on

MNS : राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केल्या पासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या आणि आंदोलनात स्वतःवर केसेस करून घेणाऱ्या उल्हासनगरातील जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.

त्यामुळे प्रथमच पक्षाला गळती लागल्याचे चित्र उघड झाले असून वरिष्ठांच्या दुर्लक्षतेमुळे हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचा आरोप पक्षप्रवेश करणाऱ्यांनी केला आहे.

महानगरपालिकेत एकही नगरसेवक नसला तरी मनसे सातत्याने प्रकाशझोतात राहिली आहे.कल्याण लोकसभेत येणाऱ्या उल्हासनगरातून मनसे पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे जोमाने काम केले.

मात्र निवडणुकीचे काम करत असताना श्रीकांत शिंदे यांच्याकडून आलेले प्रचार साहित्य तथा इतर वस्तूचे योग्य प्रकारे वाटप न झाल्याची बोंब उल्हासनगरच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी मारली होती.

 राज ठाकरेंच्या वाढदिवशीच मनसेला धक्का, निष्ठावान पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! विधानसभेला 'एकला चलो रे'चा नारा; २५० उमेदवार उभे करण्याची तयारी?

तसेच याबाबतचे व्हिडिओ ही सोशल मीडियावर वायरल झाले होते.त्याचा परिणाम आता समोर दिसू लागला असून हेवेदावे,मतभेद आणि गटबाजीला कंटाळून गेल्या 18 वर्षांपासून पक्षात काम करणारे शहर उपाध्यक्ष सुभाष हटकर,शहर सचिव,माजी नगरसेवक शालीग्राम सोनावणे,शुभांगी सोनवणे,अनिल माखिजा सह काहींनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री,प्रदेश सरचिटणीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.

 राज ठाकरेंच्या वाढदिवशीच मनसेला धक्का, निष्ठावान पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! विधानसभेला 'एकला चलो रे'चा नारा; २५० उमेदवार उभे करण्याची तयारी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.