मुंबईत कोरोना रूग्णांमध्ये वाढ पण रुग्णालयांच्या खाटा ५० टक्के रिकाम्याच, कारण...

Coronavirus
Coronavirus
Updated on

मुंबई: महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा मुंबईतही झपाट्याने वाढत आहे. पण असे असले तरी महापालिका आणि खासगी रुग्णालयात असणाऱ्या कोरोना रूग्णांसाठीच्या जवळपास ५० टक्क्यांहून अधिक खाटा हा रिक्त असल्याचं चित्र आहे. सध्याच्या परिस्थितीत मुंबई शहरात कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. तरीही या वर्षाच्या जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात 'जंबो कोविड १९' सुविधेत आणि रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रूग्णांच्या आकड्यात घट दिसून येत आहे. सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईनचा पर्याय सुचवल्याने रुग्णालयात खाटा रिकाम्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अधिकाऱ्यांच्या मते लक्षणरहित असलेल्या ७० टक्के रुग्णांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. तर, एकूण खाटांपैकी ५३ टक्के खाटा रिक्त आहेत. पण, यातही ऑक्सिजन खाटांची गरज वाढली आहे. पालिकेच्या डॅशबोर्डच्या मते, सध्या मुंबईत २३ हजार ४४८ सक्रिय कोविड-१९ रूग्ण आहेत. यापैकी ७० टक्के (१५ हजार २०) लक्षणविरहीत आहेत. रुग्णालयात एकूण १३ हजार ५१४ खाटा उपलब्ध आहेत, त्यापैकी ७ हजार १८३ भरलेले आहेत. तर, ८ हजार ४६१ ऑक्सिजन खाटांपैकी ४ हजार ८७ खाटा भरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ९६६ व्हेंटिलेटर खाटांपैकी ६५७ खाटा भरलेल्या आहेत. सध्या सीसीसी-१ मधील १२ हजार ५३५ सक्रिय खाटांपैकी ५५४ खाटा भरलेल्या आहेत. विशेष म्हणजे, गंभीर प्रकरणात लागणाऱ्या आयसीयू खाटांच्या वापरातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसत आहे.

"कोरोनाबाधित रूग्णांचा दैनंदिन प्रवेश आधीच्या ७० ते ८०च्या तुलनेत ५० टक्क्यांनी म्हणजेच ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दररोज, आम्ही गंभीर तसेच इतर रुग्णांच्या केसेसमध्ये घट नोंदवत आहोत. रुग्णालयातील जवळपास २५ टक्के खाटा रिक्त आहेत आणि आता आम्ही अधिक सौम्य ते मध्यम लक्षणे असणारे रुग्ण पाहत आहोत, ज्यांना आठ दिवसांत डिस्चार्ज दिला जातो आणि नंतर आणखी १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते", वरिष्ठ आरोग्य अधिका-यांनी स्पष्ट केले. बी. वाय. एल. नायर आणि लोकमान्य टिळक या रुग्णालयातही अशाच पद्धतीने रुग्णांची संख्या दिसत आहे. दररोज किमान ५० ते ६० रुग्णांची नोंद केली जात आहे.

मुंबईकरांसाठी ही चांगली बातमी आहे, कारण रूग्णालयात दररोज दाखल होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. पूर्वी दिवसाला ९० रुग्ण दाखल व्हायचे. आता जवळजवळ ४० ते ६० टक्के केसेस हे सौम्य ते मध्यम लक्षणांची आहेत.
-सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी

बरेच रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. कारण, त्यांना लक्षणे नाहीत आणि त्यांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याची गरज नाही. सध्या इमारतींतील लोकांची संख्या वाढत आहे, ते घरीच राहून त्यांच्यावर उपचार करण्याचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे, रुग्णालयात दाखल होण्याची संख्या कमी असून रुग्णालयांतील गर्दी कमी आहे. वॉर्ड-स्तरीय वॉर रूममधील डॉक्टर होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या रुग्णांचा पाठपुरावा करतात. बरेच रुग्ण त्यांच्या डॉक्टरांचा सल्लाही घेतात. शहरात सध्या ४७० गंभीर रूग्ण आहेत.
-अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.