चिंताजनक! मुंबईत आठवड्याभरात कोरोनाचे 184 बळी

चिंताजनक! मुंबईत आठवड्याभरात कोरोनाचे 184 बळी
Updated on

मुंबई: सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. रुग्णसंख्येच्या वेगाने त्यांच्यावर उपचार करणारी यंत्रणादेखील वाढली पाहिजे या विचारातून मुंबईत आणखी 4 ठिकाणी कोविड सेंटर उभारली जात आहेतस अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. परंतु, वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याभरात मुंबईत कोरोनाने एकूण 184 रुग्णांचा बळी घेतला. कोरोनाचा वेगाने होणारा फैलाव आणि लसतुटवडा अशा दोन्ही गोष्टींमुळे सध्या राज्यात चिंतेचे वातावरण आहे. तशातच हळूहळू रूग्ण दगावण्याची टक्केवारी वाढत असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे.

शनिवार मुंबईत 50 रुग्णांचा मृत्यू झाला. या वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे मुंबईतील मृतांचा एकूण आकडा 11 हजार 959वर पोहोचला. काही दिवसांपूर्वी दररोज दगावणाऱ्या रूग्णांचा आकडा पाचपेक्षाही कमी होता. मात्र हल्ली या आकड्यात वाढ दिसून येत आहे. मुंबईत बाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. दररोज सरासरी 10 हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांचा आकडाही वाढताना दिसतोय. मुंबईत वेगवेगळ्या रुग्णालयांत मिळून एकूण 1 हजार 199 गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. पालिकेच्या वॉर रूम डॅशबोर्डमध्ये अनेक बेड रिक्त असल्याचे दाखवण्यात आले आहे. बेड रिक्त असल्याचे डॅशबोर्ड मध्ये दिसत असले, तरी पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात आयसीयू, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध नसल्याचा अनुभव अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आला आहे. बेड्ससाठी 2 ते 3 दिवस प्रतीक्षा करावी लागत असून त्यानंतरही अनेक रुग्णांना बेड्स मिळत नसल्याचे चित्र आहे.

पालिकेच्या वॉर रूम डॅशबोर्ड मधील 11 एप्रिलच्या माहितीनुसार, मुंबईत एकूण 2 हजार 410 आयसीयू बेड्स आहेत. त्यातील 2 हजार 323 बेड्स भरले असून केवळ 87 बेड्स रिक्त आहेत. तर 9 हजार 762 ऑक्सिजन बेड्स असून त्यातील 8 हजार 481 बेड्स भरलेले आहेत. त्याशिवाय, साधे 1 हजार 281 बेड्स रिक्त असल्याचे सांगण्यात आले. व्हेंटिलेटरवर बेड्सची क्षमता 1 हजार 273 असून त्यापैकी 1 हजार 243 बेड्स भरले आहेत आणि केवळ 30 बेड्स रिक्त आहेत.

(संपादन - विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.