Palghar: मोखाड्यात ग्राहकांना येतंय अव्वाच्या सव्वा बिल; वसुलीसाठी महावितरणचा आटापिटा

MSEB: थकीत वीजबील वसुलीवर प्रश्नचिन्ह ऊभे राहिले आहे
मोखाड्यात ग्राहकांना येतंय अव्वाच्या सव्वा बिल; वसुलीसाठी महावितरणचा आटापिटा
Palghar: sakal
Updated on

Mokhada Electricity News: महावितरण कंपनीने थकीत ग्राहकांना 30  टक्के रक्कम भरून, उर्वरित रक्कम हप्त्यात भरण्याची सुवर्ण सवलत देण्याची घोषणा केली आहे. समाज माध्यमातून, त्याचा महावितरणचे अधिकारी प्रसार करत आहेत.

मात्र, नियमीत वीजबील भरणार्या ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने, ग्राहक संतप्त आहेत. गेली अनेक महिण्यांपासुन अघोषीत लोडशेडिंग, सततचा खंडित व कमी दाबाने होणारा  वीजपुरवठा, अव्वाच्या सव्वा येणारे बील यामुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत. त्यामुळे थकीत वीजबील वसुलीवर प्रश्नचिन्ह ऊभे राहिले आहे. 

 मोखाडा तालुक्यात  12  हजारांहून अधिक विज ग्राहक कुटुंब आहेत. तालुक्याला वीजपुरवठा डहाणू च्या  132  केव्ही च्या ऊपकेंद्रातुन होतो आहे. वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने, तालुक्यातील वीज ग्राहक नाराज आहेत.

तर अघोषीत लोडशेडिंग, सतत खंडित आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. असे असताना ही ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येते आहे. ते वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी दारोदारी फिरत आहेत. वीज बील न दिल्यास, वीज पुरवठा खंडीत केल्याची कारवाई केली जात आहे. त्यामुळे वीज ग्राहक संतप्त आहेत. 

           दरम्यान, थकीत वीजबील आणि मीटर काढुन आणलेल्या ग्राहकांसाठी महावितरणने, थकीत वीजबीलापैकी  30  टक्के रक्कम भरून ऊर्वरित रक्कम  5  हप्त्यात भरण्याची योजना आणली आहे. त्याचा प्रसार समाज माध्यमातून, वीज ग्राहकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न महावितरणचे अधिकारी करत आहेत.

मात्र, सुरळीत वीजपुरवठ्याची तसेच योग्य वीजबीलाची ग्राहकांची मागणी आहे. अनेक महिण्यांपासुन सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी झटतात.

मात्र, अधिकारी मुख्यालयाला न राहता घरून कारभार हाकत असल्याचा आरोप वीज ग्राहकांकडुन केला जातो आहे. थकीत वीजबील आणि ग्राहक संख्येची, ऊप कार्यकारी अभियंता राजेश शिवगण यांच्या कडे माहिती मागीतली असता, त्यांनी ती दिली नाही. 

1) गेली अनेक महिण्यांपासुन मोखाड्यातील वीज ग्राहक अघोषीत लोडशेडिंग, कमी दाबाने तसेच सततचा खंडित होणारा वीजपुरवठा, अव्वाच्या सव्वा येणारे बील यामुळे वीज ग्राहक कुटुंब हैराण झाले आहेत. मात्र, वीज बिलांची पठानी वसुली केली जाते आहे.

अधिकारी मुख्यालयाला न राहता घरून कारभार चालवत आहेत. सुरळीत वीजपुरवठा नसतांना वीज ग्राहक कुटुंब बिले कसे भरणार.

हनुमंत पादीर, उपसरपंच, काष्टी- सावर्डे ग्रामपंचायत. 

वीज ग्राहक कुटुंबांना सरासरी वीजबील आकारुन लाखो रूपयांची बीले देण्यात आली आहेत. ग्राहकांमध्ये महावितरण आणि अधिकार्यांविरोधात प्रचंड रोष असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. येत्या मंगळवारी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे या तक्रारी विषयी बैठक घेणार आहे तसेच जे अधिकारी मुख्यालयाला राहत नाही तसेच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा आणि योग्य बील देत नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याची सुचना संबंधित अधिकार्यांना देणार आहे. 

* डाॅ हेमंत सवरा, खासदार पालघर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.