कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल

शहरातील बॅनर वेधतात लक्ष
Show the road that was built Shiv Sena troll from MNS roads MIDC
Show the road that was built Shiv Sena troll from MNS roads MIDCsakal
Updated on

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांचे काम गेले अनेकवर्षे न झाल्याने या रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटींचा निधी मंजुर झाला असून 20 वर्षापासून रखडलेले रस्ते लवकरच नीट होणार असल्याचे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आणि त्याचे बॅनरदेखील या भागात लागले. या गोष्टीला सहा सात महिने उलटले तरी एकाही रस्त्याचे काम अद्याप झाले नसल्याने मनसेने यावरुन शिवसेनेला ट्रोल केले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी श्रेयाचे लागलेले बॅनर तिनदा फाटले पण काम झाले नाही असा खोचक टोला ट्विटरच्या माध्यमातून लगावल्यानंतर मनसे डोंबिवली शहरच्या वतीनेही शहरभर बॅनर लावत शिवसेनेला ट्रोल करण्यात आले आहे. कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा असे या बॅनरवरील ठळक विधान सध्या डोंबिवलीकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Show the road that was built Shiv Sena troll from MNS roads MIDC
पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील विकासकामांसाठी निधींचा सपाटाच सत्ताधाऱ्यांनी लावला असून त्याचे मोठ मोठे बॅनर देखील शहरात लागले आहेत. शहरातील रस्त्यांच्या कामाला मिळालेली मंजुरी आणि त्यासाठी मंजुर झालेल्या निधीचे बॅनर शहरात झळकले आहेत. रस्त्यांच्या कामास सुरुवात होण्यास अद्याप अनेक ठिकाणी सुरुवात झालेली नसली तरी कधी ना कधी काम होऊन रस्ता सुधारेल असे दिलासादायक हे फलक डोंबिवलीकरांना समाधान देतील अशी आशा सत्ताधाऱ्यांना आहे. निधी मंजुर होऊन पाच सहा महिन्यांच्या कालावधी उलटला तरी प्रत्यक्षात कामास सुरुवात न झाल्याने मनसेने पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेवर झोड उठवली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी नुकतेच एक ट्विट करीत याकडे सर्वांचेच लक्ष वेघले होते. श्रेय लाटण्यात पीएचडी केले असल्याचे बोलत सत्ताधारी शिवसेनेने मनसे आमदार पाटील यांना टोला लगावला होता. त्यावर आमदारांनीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला होता. हा वाद मिटला असे वाटत असतानाच आमदार पाटील यांच्या ट्विटने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. कामाचे श्रेय लाटण्यासोबतच कामे करुन दाखवा तुमचे अभिनंदनाचे बॅनर आम्ही लावू असे पाटील यांनी ट्विट करीत पुन्हा एकदा सेनेला विकासकामांवरुन लक्ष केले आहे.

काय म्हणाले आमदार पाटील ट्विटमध्ये

'गेल्यावर्षी श्रेय घेण्यासाठी तिसऱ्यांदा लावलेले बॅनर फाटले पण, तरीसुद्धा आमच्या डोंबिवली एमआयडीसी विभागातील रस्ते अजून तसेच आहेत. कामे लवकर चालू करा, तुमच्या अभिनंदनाचे बॅनर आम्ही लावू असा टोला शिवसेनेला आमदार पाटील यांनी ट्विटरमधून लगावला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी हे ट्रिट टॅग देखील केले आहे.

हे फलक घेतात लक्ष वेधून

आमदारांनी ट्विट केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर यांच्यावतीने एमआयडीसी परिसरात लावण्यात आलेले बॅनर सर्व कल्याण डोंबिवलीकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. पत्र लेखनच्या स्वरुपात हे बॅनर लावण्यात आले असून यावर 'श्री 'श्रेय' स निधीमंजुरकर यांस, कोपरापासून हात जोडून सप्रेम नमस्कार ! सालाबादप्रमाणए एमआयडीसी येथील रस्त्यांसाठी निधी मंजुर झाल्याचे होर्डींग, ब्यानर दाखवलेत 'कधीतरी तयार झालेला रस्ता सुद्धा दाखवा' आपले कृपाभिलाषी, त्रासलेले डोंबिवलीकर अशा शब्दात मनसे ने शिवसेनेला ट्रोल केले असून ़बॅनर झळकाविण्यात देखील शिवसेनेला टोला लगावण्याची संधी त्यांनी सोडलेली नाही. होर्डींग आणि ब्यानरबाज मित्र मंडळी डोंबिवली परिसर असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.