Panvel News : श्रीक्षेत्र भगवानगड पतसंस्थेने केली ठेवीदाराची फसवणूक; संस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

खांदा कॉलनी परिसरातील श्रीक्षेत्र भगवानगड अर्बन निधी लिमीटेड पतसंस्थेने खांदा कॉलनीतील एका ठेवीदाराची 1 लाख रुपयांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे.
fraud
fraud sakal
Updated on

पनवेल - खांदा कॉलनी परिसरातील श्रीक्षेत्र भगवानगड अर्बन निधी लिमीटेड पतसंस्थेने खांदा कॉलनीतील एका ठेवीदाराची 1 लाख रुपयांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी या पतसंस्थेचा संस्थापक नारायण नागरगोजे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या पतसंस्थेने परभणीत देखील अनेक गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याने तेथील आर्थिक गुन्हे शाखेने नागरगोजे याला अटक केली आहे. लवकरच खांदेश्वर पोलीस नागरगोजे याचा ताबा घेणार आहेत.

जुन 2021 मध्ये खांदा कॉलनी परिसरात श्रीक्षेत्र भगवानगड अर्बन निधी लिमीटेड पतसंस्था सुरु करण्यात आली होती. त्यावेळी या पतसंस्थेतील कर्मचाऱयांनी खांदा कॉलनी सेक्टर-8 मध्ये राहणारे जयप्रकाश काळे (65) यांची भेट घेऊन त्यांना इतर बँकेपेक्षा अधिक व्याजदर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे काळे यांनी 1 लाख रुपयांची रक्कम 1 वर्षाच्या मुदत ठेवीमध्ये ठेवली होती.

1 वर्षानंतर काळे यांना व्याजासह 1 लाख 13 हजार रुपये मिळतील असे पतसंस्थेकडुन त्यावेळी सांगण्यात आले होते. एक वर्षानंतर जुलै 2022 मध्ये काळे सदर पतसंस्थेमध्ये आपली रक्कम काढण्यासाठी पावती घेऊन गेले असता, सदर पतसंस्था बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे काळे यांनी या पतसंस्थेचे संस्थापक नागरगोजे यांना संपर्क साधला असता, त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. मात्र आजपर्यंत नागरगोजे यांनी काळे यांची रक्कम परत दिली नाही. तसेच पतसंस्था देखील सुरु केली नाही. त्यानंतर काळे यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता, सदर पतसंस्थेने परभणी जिह्यात देखील अनेक ग्राहकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तेथील आर्थिक गुन्हे शाखेने नागरगेजे याला अटक केली आहे. परभणी पोलिसांकडुन लवकरच नागरगेजे याचा ताबा घेण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बरकडे यांनी सांगितले.

फसवणुक झालेल्या ग्राहकांनी माहिती देण्याचे आवाहन

खांदा कॉलनी परिसरातील श्रीक्षेत्र भगवानगड अर्बन निधी लिमीटेड पतसंस्था मागील अनेक महिन्यांपासुन बंद करण्यात आली आहे. या पतसंस्थेत गुंतवणुक करणाऱया अनेक गुंतवणुकदारांची देखील फसवणुक झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खांदा कॉलनी येथील श्रीक्षेत्र भगवानगड अर्बन लिमिटेड या पतसंस्थेत गुंतवणुक करणाऱया ग्राहकांनी स्वत: पुढे येऊन खांदेश्वर पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांकडुन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.