Shubhangi Patil : "खरी लढाई सुरू..." ; ठाकरे गटात प्रवेशानंतर शुभांगी पाटलांचा इशारा कुणाला?

Shubhangi Patil
Shubhangi Patil
Updated on

Shubhangi Patil : नाशिक पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. 

शुभांगी पाटील नाशिक पदवीधरमध्ये झुंझारपणे निवडणूक लढल्या. फार कमी मतांनी त्यांचा पराभव झाला. त्याला पराभव म्हणता येणार नाही. त्यांचा लढा महत्वाचा होता. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवबंधन बांधले. तसेच ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. 

यावेळी शुभांगी पाटील यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला. "मी हारले नाही, तुम्ही हारु नका. आता खरी लढाई सुरू झाली आहे. मी आज शिवबंधन बांधले. मी शब्दाला पक्की असते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी जबाबदारी माझ्यावर देतील ती मी स्विकारेल. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसाठी लढत राहील. जुन्या पेन्शनसंदर्भात मी लवकरच आंदोलन करणार आहे," असे शुभांगी पाटील म्हणाल्या.

Shubhangi Patil
BMC Budget : अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भक्कम तरतूद; मुंबईत बनणार हजारो कोटींचे रस्ते

नाशिक पदवीधर मतदार संघातून अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. पहिल्याच फेरीपासून आघाडीवर असलेल्या तांबे यांनी महाविकास आघाडीनं पाठींबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. 

Shubhangi Patil
Kasaba By-Poll Election : टिळक कुटुंबाला का डावललं? चंद्रकांत पाटील म्हणाले हा निर्णय...

नाशिक विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रावर ३० जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. विभागातील २ लाख ६२ हजार ६७८ मतदानांपैकी १ लाख २९ हजार ४५६ इतके मतदान पार पडलं होतं. यानंतर काल याची मतमोजणी पार पडली. यामध्ये पाचव्या फेरी अखेर सत्यजीत तांबे यांना ६८ हजार ९९९ मतं मिळाली. तर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५४३ मतं मिळाली.

Shubhangi Patil
Shailesh Tilak : कसबा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट! शैलेश टिळक नाराज; म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()