CIDCO: दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सिडकोच्या घरांची सोडत,निवडण्यासाठी ग्राहकांना १५ पर्याय

Latest Mumbai News: सिडकोचा मार्केटिंग विभाग व व्यवस्थापन विभाग घरांची सोडत काढण्यासाठी कार्यरत झाला आहे.
CIDCO: दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सिडकोच्या घरांची सोडत,निवडण्यासाठी ग्राहकांना १५ पर्याय
Updated on

Latest Mumbai News: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडको बांधत असलेल्या ६७ हजार घरांपैकी २६ हजार घरांची सोडत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला काढण्यासाठी सिडको सज्ज झाली आहे. त्याकरिता सिडकोकडून घर खरेदीदाराकडून सर्वप्रथम नोंदणी अर्ज मागविले जाणार आहेत. नोंदणी झालेल्या अर्जदारांची आवश्यक कागदपत्रे (केवायसी डॉक्युमेंट) तपासल्यानंतर पात्र अर्जदारांना प्राधान्यक्रम देऊन पसंतीच्या घरांची नोंदणी करता येणार आहे.

येत्या ११ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वाशी येथे महाराष्ट्र भवनच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडको घरांची सोडत काढण्याचा निश्चय सिडकोने केला आहे. त्यादृष्टीने सिडकोचा मार्केटिंग विभाग व व्यवस्थापन विभाग घरांची सोडत काढण्यासाठी कार्यरत झाला आहे.

CIDCO: दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सिडकोच्या घरांची सोडत,निवडण्यासाठी ग्राहकांना १५ पर्याय
आणखी 25 हजार घरांची योजना - मुख्यमंत्री

सिडकोच्या इतिहासात प्रथमच २६ हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत ग्राहकाला आपल्या पसंतीचे घर निवडण्यासाठी १५ घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या पसंतीक्रमाला एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त होतील; त्या घरासाठी सोडत निघून विजेत्याला ते घर उपलब्ध होईल. त्यामुळे या घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत, पैसे भरण्याची मुदत, पसंतीच्या घरासाठी पर्याय निवडण्याची व सोडतीची मुदत आदींचे वेळापत्रक सिडको जाहिरातीत नमूद करणार आहे.

दरम्यान, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सोमवारी (ता. ७) घरांची सोडत काढण्याचे सूतोवाच केले होते; मात्र तांत्रिक कारणास्तव सोमवारची नियोजित सोडत पुढे ढकलण्यात आली. गेले काही महिने सिडको घरांची सोडत काढली जाणार असल्याची घोषणा करून नंतर या घरांची सोडत सातत्याने सिडकोकडून पुढे ढकलली जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

CIDCO: दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सिडकोच्या घरांची सोडत,निवडण्यासाठी ग्राहकांना १५ पर्याय
Navi Mumbai News: या कारणावरुन मेट्रो स्थानकावर प्रवासी होत आहेत हैराण

आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन नवरात्रोत्सवातच सिडकोच्या घरांची घोषणा केली जाणार आहे. या सोडतीत दुर्बल घटकांसाठी १३ हजार, अल्प उत्पन्न गटासाठी १३ हजार घरे आहेत. यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास पन्नास टक्के घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. त्याचबरोबर खांदेश्वर, मानसरोवर, तसेच खारकोपर, बामणडोंगरी गृहप्रकल्पातील शिल्लक घरांचा या गृहनिर्माण सोडतीत समावेश आहे.

- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

CIDCO: दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सिडकोच्या घरांची सोडत,निवडण्यासाठी ग्राहकांना १५ पर्याय
‘सिडको’वर बोलण्यास चव्हाणांचा नकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.