BMC Scam : मुंबई महापालिकेत १२ हजार कोटींचा घोटाळा! पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वखाली SIT करणार चौकशी

SIT formed to investigate BMC rs 12000 crore Scam    under Mumbai Police Commissioner
SIT formed to investigate BMC rs 12000 crore Scam under Mumbai Police Commissioner sakal
Updated on

मुंबई महापालिकेच्या कथित घोटाळा प्रकरणाची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. दरम्यान आता या १२००० कोटी रुपयांच्या मुंबई महापालिकेतील कथित आर्थिक अनियमिततेचा तपास करण्यासाठी SIT ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे निर्देष दिले आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या नेतृत्वात ही SIT चौकशी करणार आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांसह इतर विभागातील पोलिस अधिकाऱ्यांचा या एसआयटीमध्ये समावेश असणार आहे. ज्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपायुक्त आणि साहाय्यक पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांचा या SIT मध्ये समावेश असणार आहे.

SIT formed to investigate BMC rs 12000 crore Scam    under Mumbai Police Commissioner
Video : टेलिप्रॉम्पटर मिळाला नाही म्हणून डायरी काढली अन् केली फेकायला सुरवात; काँग्रेसने उडवली खिल्ली

काही दिवसांपूर्वी कॅगच्या अहवालानंतर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतील कथित आर्थिक अनियमिततेचा चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता ही एसआयटी या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

SIT formed to investigate BMC rs 12000 crore Scam    under Mumbai Police Commissioner
ED Raid in Sangli : सांगलीत बड्या व्यापाऱ्यांच्या घरावर ईडीचे छापे! परिसरात खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.