मुंबई - मुंबईत प्रदुषण वाढले आहे. धुळीचे कण हवेत पसरु नये यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. यासाठी अनुभवी कंपन्यांनी कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी दर्शविली आहे. यात दोन विदेशी कंपन्यांसह चार भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषण मुक्त मुंबईसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुबईतील कंपनीशी चर्चा करा, असे आदेश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर स्वारस्य अभिरुची मागवण्यात आल्या आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आधी चार भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला.
परंतु जागतिक स्तरावर प्रतिसाद न मिळाल्याने स्वारस्य अभिरुची मुदतवाढ देण्यात आली. या दरम्यान दोन विदेशी कंपन्या इच्छूक असून तसा मेल पालिका प्रशासनाला केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. २२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रदुषण रोखण्यासाठी कंपन्यांकडून त्यांचे तंत्रज्ञान समजावून घेतले जाणार आहे. यानंतर पात्र ठरणारे तंत्रज्ञान निश्चित झाल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार आहेत. यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.