माहुल वासियांची प्रदूषणातून सुटका; 1600 कुटुंब घेणार मोकळा श्वास ?

Mahul people
Mahul peoplesakalmedia
Updated on

मुंबई : वाढत्या प्रदूषणामुळे (Pollution) मरण यातना भोगणाऱ्या माहुलवासीयांची (Mahul people get rid of pollution ) जीवघेण्या प्रदूषणापासून सुटका होण्याची शक्यता आहे. माहुलमधील त्रासलेल्या 1600 पेक्षा अधिक माहुलवासीयांना घरे देण्याचे (houses for mahul people) निर्देश सरकारकडून (Government) देण्यात आले असून याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) काळात आतापर्यंत 850 कुटुंबांना घरे देण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाचे (High court) तसे आदेश दिले होते. ( sixteen hundred families from mahul get rid of pollution as Maharashtra government implementation for houses)

तसेच उर्वरित कुटुंबांच्या पर्यायी घरांसाठी अर्ज केलेल्या कुटुंबांना घरे मिळावीत यासाठी माहुलवासीयांचा संघर्ष सुरू होता. यासाठी झालेल्या बैठकांमध्ये कुर्ला येथील उपलब्ध असलेली घरे माहुल पीडितांना देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पर्यायी घरासाठी अर्ज केलेल्या 1660 कुटुंबांची यादी 'घर बचाओ , घर बनाओ' आंदोलनाच्या राष्ट्रीय संयोजक मेधा पाटकर आणि माहुल समिती सदस्यांनी सरकारला दिली आहे.

सहयाद्री अतिथीगृहात माहुल प्रकल्पग्रस्तांना उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड , उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत , मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त, एमएमआरडीएचे आयुक्त , एसआरए आयुक्त , म्हाडा आयुक्त यांच्यासह इतर घर बचाओ, घर बनाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर आणि माहुल समिती सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत महाविकास आघाडी सरकारने माहुल वासियांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केवळ एमएमआरडीए, एसआरए, म्हाडा आणि मुंबई महानगरपालिका यांच्यात नियोजन करून घरे कोणत्या प्रकारे उपलब्ध करून देता येतील यासाठी 3 ते 4 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. नव्याने देण्यात येणाऱ्या 1600 हून अधिक घरांच्या थोड्याफार कामासाठी त्वरीत फंड मजूर करून रहीवाश्यांचे पुनर्वसन करण्यात येईल असेही ठरले आहे.

Mahul people
मुंबई : डॉक्टर सुधीर शेट्टी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

माहुल प्रकल्पग्रस्तांना यापूर्वी मिळालेल्या गोराई आणि अप्पा पाडा, मालाड येथील घरांच्या थकीत वीजबिले , पाण्याची बिले तसेच लिफ्ट , ड्रेनेज , इत्यादी कामांसाठी यापूर्वी अनेकदा चर्चा व निर्णय झालेत, त्यानुसार बरेचसे काम पूर्ण झाले आहे . उर्वरित संपुर्ण रक्कम भरण्याचा निर्णय ही घेण्यात आला असून त्यासाठी लागणारा खर्च ही मंजूर करून सबंधित विभागाला देण्यात आला आहे.

प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या समस्या

परिसरतील प्रदूषित वतावरणामुळे राहिवाश्यांच्या आरोग्याचे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. डोकेदुखी,श्वसनास त्रास,मळमळ,छातीत जळजळ,पोटाचे विकार उद्भवत आहेत.याशिवाय केस गळणे, अंगावर पुरळ उटणे, खाज,लाल चट्टे येणे यांसारख्या समस्या वाढल्या आहेत.महिलांना गर्भपात, मासिक पाळीतील अनियमितता सहन करावी लागत आहे. दमा,उच्च रक्तदाब,लकवा यांसह मनोविकाराच्या समस्या देखील आहेत.

सरकारने घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र या आश्वासनाची पूर्तता लवकर व्हावी. यामुळे शेकडो कुटुंबांना मोकळा श्वास घेता येणार आहे.

-रेखा घाडगे , सदस्य , घर बचाओ,घर बनाओ समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.