वसई-विरारकरांना जलदिलासा; सुर्या, धामणी धरणात ६५ टक्के पाणीसाठा

Surya dam
Surya damgoogle
Updated on

वसई : उन्हाच्या झळांना सुरुवात झाली की ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागालाही पाणीटंचाईला (water scarcity) सामोरे जावे लागते; मात्र वसई-विरारकरांची (vasai-virar) पुढील वर्षभर पाण्याची चिंता मिटली आहे. कारण या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या, धामणी धरणांत (surya and dhamani dam) ६५ टक्के इतका पाण्याचा साठा असून, पेल्हार व उसगाव धरणाचे पाणीदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे वसई-विरार महापालिकेला (vasai-virar municipal corporation) शक्य होणार आहे. वसई-विरार महापालिकेची लोकसंख्या २५ लाख इतकी आहे. पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण व्हावी म्हणून नव्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यातच सूर्या धामणी, पेल्हार व उसगावया तीन धरणांतून वसई-विरार, नालासोपारा व वसई गाव या भागाला पाणीपुरवठा केला जातो.

Surya dam
मुंबई लोकलमध्ये तरुणीवर ब्लेडने हल्ला; चर्नी रोड स्टेशनवरील घटना

गृहसंकुले, बैठी घरे, विविध संस्था, कंपन्या आदींना पाण्याच्या जोडण्या महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. नव्याने जलवाहिन्या अंथरण्याचे काम देखील महापालिकेने हाती घेतले असून, ६९ गाव अमृत पाणीपुरवठा योजना देखील पूर्णत्वास आली आहे. त्याचबरोबर सामूहिक नळजोडणीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून वसई-विरार महापालिका हद्दीतील नागरिकांना अधिकचे पाणी मिळावे, याकरिता सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जलदगतीने सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून महापालिका, एमएमआरडीए गृहनिर्माण प्रकल्प व २७ गावांना १८५ एमएलडी इतके पाणी मिळणार आहे.

सद्यस्थितीत सूर्या धामणी धरणात वर्षभराचा तर पेल्हार धरणार ९० दिवस व उसगाव ११० दिवस पुरेल इतका पाण्याचा साठा उपलब्ध आहे. या तिन्ही धरणांतून येणारे पाणी हे शुद्ध केले जाते. वसई-विरार महापालिकेच्या अखत्यारित असणाऱ्या चंदनसार, विराट नगर, नालासोपारा, चाणक्य नगरी, सेंटर पार्क, नवघर व वसई यासह अन्य भागात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. यांमध्ये धरणातून येणाऱ्या पाण्याची साठवणूक करून, नंतर हे पाणी शहरवासीयांना वितरित केले जाते.

Surya dam
"हक्काच्या घरासाठी प्रसंगी मुंबईची कचराकोंडी करू"

धरणाचे नाव क्षमता उपयुक्त पाणी टक्केवारी

धामणी २७६.३५ १८०.३६७ ६५.२७ टक्के (वर्षभराचा साठा)
उसगाव ४.९६ ३.१९६ ६४.४३ टक्के (११० दिवस)
पेल्हार ३.५६ १.५१३ ४२.५० टक्के (९० दिवस)
(पाणीसाठा दशलक्ष घनमीटर )

नवीन प्रकल्प

वसई-विरार शहरासाठी देहरजी, खोलसापाडा, सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना हे नवे प्रकल्प देखील हाती घेतले आहेत. भविष्यात वाढणारी लोकसंख्या व त्यामानाने नियोजन करणे सहज शक्य होणार आहे. याकरिता आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

वसई, विरार शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धामणी धरणात वर्षभर पुरेल इतका साठा आहे. त्यात उसगाव व पेल्हार धरणात देखील ७ महिन्यांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणीटंचाई भासणार नाही. पाणी मुबलक प्रमाणात असले तरी नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून व काटकसरीने वापरावे.

- सुरेंद्र ठाकरे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.