मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांना एका ३० वर्षीय सोने तस्कराला अटक केली आहे. या तस्कराने प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळलेले ८ गोल्ड बार गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. हे सोने तस्करीचे हे अगदीच दुर्मिळ प्रकरण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोने गिळलेल्या या तस्कराची तब्यत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी जेव्हा एक्सरे केला तेव्हा आरोपीच्या पोटात सोन्याचे ३ ते ५ सेंटीमीटर लांबीचे बार आढळून आले. हे बिस्किटे त्याच्या आतड्यांमध्ये अडकले होते. जेव्हा आरोपीने सर्जरी करण्यास नकार दिला तेव्हा डॉक्टरांनी त्याला जुलाबाच्या गोळ्या देखील खाऊ घातल्या, इतकेच नाही तर रोज तीन लीटर पाणी पाजलं रोज एक डझन केळी देखील खाऊ घातली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ८ मे रोजीचे असून आरोपी हा यूपीमधील इंतिजार अली नावाचा तरुण आहे. जेव्हा तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचाला तेव्हा त्याने अटक होण्याच्या भीतीने प्लस्टीकच्या फॉइलमध्ये गुंडाळलेले ७ सोन्याचे बार गिळले. इंतिजार अलीने त्याच्या चौकशीत ही बाब कबूल केली आहे. जेव्हा त्याची तब्यत बिघडली तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा एक्सरेमध्ये याचा खुलासा झाला.
जेजे रुग्णालयाच्या सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने त्याच्या पोटातून तब्बल २५० ग्रॅम सोने बाहेर काढले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याची तस्करी करण्याची ही पद्धत दुर्मिळ आहे. डॉक्टरांनी दोन दिवस सोनं बाहेर पडण्याची वाट पाहिली.
मंगळवारी संध्याकाळी जेव्हा एक्स-रे मध्ये काहीच हालचाल दिसली नाही, तेव्हा लॅप्रोस्कोपीक सर्जरी करण्याचा विचार करण्यात आला. डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही सर्जरी करण्याचा विचार केला कारण सोन्याची बिस्किटे छोट्या अतड्यामध्ये अडकली होती, त्यामुळे कोणतीही सर्जरी जीवघेणी ठरली असती.
यानंतर डॉक्टरांनी अलीला दोन दिवस एक डझन केळी आणि हिरव्या पाल्याभाज्या आहारात द्यायला सुरूवात केली. डॉक्टर म्हणाले की, ड्रग पॅलेट्सच्या प्रकरणात आम्ही रोगींना जुलाब देतो, पण सोन्याची बिस्कीटे असल्याने आम्ही हाय फायबर आहार देत राहीलो आणि तीन लीटर पाणी पाजलं, पोटदुखी, उल्टी आणि पोट फुगणे या लक्षणांमुळे आम्ही पूर्णवेळ त्यावर लक्ष ठेऊन होतो.
या सर्व प्रयत्नानंतर गुरूवारी अलीने सर्व आठ सोन्याची बिस्किटे बाहेर काढली. त्यानंतर त्याला कस्टम अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं. या प्रत्येक सोन्याच्या बिस्किटांची लांबी तीन ते पाच सेंटीमिटर होती आणि त्यांचं वजन २५० ग्रॅम होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.