Snake In Car : मुंबईकरांनो सावधान कारच्या बोनेट,संस्पेशनमध्ये असू शकतो 'साप'

Mumbai Rain: रविवारी शिवाजी पार्क शेजारच्या रस्त्यावर अजगर सापडला, याची सूचना मिळताच तातडीने सर्पमित्र अतुल कांबळे पोहोचले
 : मुंबईकरांनो सावधान कारच्या बोनेट,संस्पेशनमध्ये असू शकतो 'साप'
Snake In Carsakal
Updated on

Monsoon in Mumbai: मुंबई, ता. १७ : पावसाळा सुरू झाला असून मुंबईत साप बाहेर निघण्याच्या घटना वाढत आहेत. मुंबईत दरवेळी जून महिन्यात दिवसाला सरासरी १०० साप बाहेर निघण्याच्या तक्रारी येतात. रविवारी शिवाजी पार्क शेजारच्या रस्त्यावर अजगर सापडला.

हा साप शिवाजी पार्क साईटहून रस्ता ओलांडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाकडील रस्त्यावर असलेल्या एका लाईटच्या केबिन बॉक्समध्ये जाऊन दडला होता. शेवटी विद्युत पुरवठा बंद करून ३.५ फुटी सापाला सर्पमित्राने बाहेर काढले.

 : मुंबईकरांनो सावधान कारच्या बोनेट,संस्पेशनमध्ये असू शकतो 'साप'
Mumbai Fire: मस्जिद बंदरमध्ये इमारतीत आग, मोठा अनर्थ टळला

गेल्यावर्षी वर्सोव्यातील एका सोसायटीतील एका सार्वजनिक शौचालयामध्ये साडेचार फुटाची घोरपड सापडली. जुलै महिन्यात मुंबईत अनेक इमारतीत तळमजल्यावरील घरातील कमोडमधून साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा व्हेन्टिलेशनच्या खिडकीतून साप आतमध्ये प्रवेश करतात. मुंबईत २५ पेक्षा अधिक प्राणिमित्र संस्था काम करतात. यामध्ये मानखुर्द येथील वाईल्ड लाइफ अँड ॲनिमल प्रोटेक्शन अँड रेस्क्यू असोसिएशन आणि रॉ या प्रमुख संस्था आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या दोन्ही संस्थांचे काम सुरू होते.

 : मुंबईकरांनो सावधान कारच्या बोनेट,संस्पेशनमध्ये असू शकतो 'साप'
Mumbai Accident: मुंबईत घडला भीषण अपघात, टँकरच्या धडकेत दोघांचा मृत्यू


पावसाळ्यात बिळामध्ये पाणी गेल्यानंतर सरपटणारे प्राणी बाहेर येतात. पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशाने अनेक लोकांचा मृत्यू होतो. घोणस, नाग, मण्यार आणि फुरसे हे चार विषारी साप आहेत. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्पदंश होऊ नये, यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे सर्पमित्र अतुल कांबळे सांगतात. तर मुंबई हे बायोडायव्हर्सिटी असणारे शहर आहे. मुंबईत खाडी, समुद्र, खारफुटी, नदी आणि नाले आहेत. मात्र, शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पामुळे प्राणी आणि पर्यावरणाला हादरा बसला आहे, त्यामुळे वन्यप्राणी नागरी भागात सापडत आहेत. मुंबईतील वन्यप्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे, असे रॉ संघटनेचे अध्यक्ष पवन शर्मा यांचे म्हणणे आहे.

वाहनचालकांनी काळजी घेण्याची गरज
गेल्या पावसाळ्यात कारचे बोनेट, सस्पेन्शन, मोटरसायकलचे इंजिन, डिक्की आणि हेडलाईटमध्ये साप लपून बसल्याची ३० पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली होती. मुंबईत पावसाळ्यात साप स्वतःला ऊब देण्यासाठी तसेच भक्ष्य गिळल्यानंतर ते पचवण्यासाठी वाहनाच्या इंजिनचा आधार शोधतात, त्यामुळे पावसाळ्यात वाहनामध्ये साप बसून असल्याच्या तक्रारी वाढतात. सर्पमित्र अतुल कांबळे यांच्या संस्थेने गेल्यावर्षी कारमधून २० पेक्षा जास्त साप रेस्क्यू केले.

 : मुंबईकरांनो सावधान कारच्या बोनेट,संस्पेशनमध्ये असू शकतो 'साप'
Navi Mumbai : 1250 रुपयांसाठी सद्दाम हुसेनने केली हत्या; पनवेलमधील धक्कादायक घटना

घरात साप
घराच्या आत, परिसरात साप लपून बसल्याच्या घटना जून, जुलै महिन्यात वाढतात. यामध्ये झोपडपट्टी, चाळींपासून ते लोखंडवालाच्या चकाचक सोसायटींचा समावेश आहे. भांडुप, मुलुंड, गोदरेज सोसायटी, लोखंडवाला, आरे कॉलनी या भागात जास्त साप आढळून येत असल्याचे पवन शर्मा यांनी सांगितले. परिसरातील घाणीमुळे उंदीर येतात. उंदरांच्या मागावर साप येतात. हे नैसर्गिक सूत्र असल्याचे ते सांगतात.

नैसर्गिक अधिवास
मुंबई शहरातून प्राणिमित्रांनी पकडलेले साप आणि इतर सरपटणारे प्राणी वनखात्याच्या हवाली केले जातात. वनक्षेत्रपाल राकेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली २७ जणांचे पथक आहे. या वन्यजीवांची पहिले वैद्यकीय तपासणी केली जाते. तपासणीत तंदुरुस्त आढळलेल्या साप, नागांना निसर्ग अधिवासात सोडले जाते. जे अनफीट आहेत त्यांना पुढील उपचार करून प्राणिप्रेमी संघटनांकडे सोडले जाते. त्यांचा सांभाळ करून ते योग्य झाल्यावर वनखात्याकडे पुन्हा सुपूर्द केले जाते, असे वन कर्मचारी संतोष भांगणे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. गेल्या पावसाळ्यात या पथकाकडे ५०० पेक्षा जास्त सरपटणारे प्राणी सुपूर्द केले. यामध्ये साप, अजगरासोबत माकड, घुबड आणि इतर प्राण्यांचा समावेश आहे.

घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा, शिळे, खरकटे अन्न घराजवळ टाकू नये. त्यामुळे उंदिर त्या ठिकाणी येतात. उंदिर आल्यानंतर त्यामागे साप येऊन सर्पदंश होण्याचा धोका आहे. चप्पलचा वापर करावा, मच्छरदाणी वापरावी, वाटेत दिसलेल्या सापाला विनाकारण मारू नका.
-अतुल कांबळे, सचिव
वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेक्शन अँड रेस्क्यू असोसिएशन

 : मुंबईकरांनो सावधान कारच्या बोनेट,संस्पेशनमध्ये असू शकतो 'साप'
Mumbai Rain: मुंबईच्या तलावांच्या क्षेत्रात पावसाची एन्ट्री, मुंबईकरांना दिलासा !

साप चावल्यास काय कराल?
साप चावल्यावर रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. सरकारी रुग्णालयात सापाची लस उपलब्ध असते, तसेच साप आढळल्यास वन विभागाच्या १९२६ क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधू शकतात. सर्पमित्र ॲपवर सर्पमित्रांची माहिती उपलब्ध आहे.

ग्राफिक्स
सर्पदंशामुळे होणारे मृत्यू
२०२२ - ५०,०००
२०२३ - ५८,०००


भारतातील सापांच्या प्रजाती
एकूण प्रजाती - ३३६
विषारी प्रजाती - ५२
कमी विषारी प्रजाती - २५

मुंबईत सापासंदर्भात येणाऱ्या कॉलची संख्या वाढली आहे. वन्यप्राण्यांबद्दल जनजागृती वाढल्यामुळे हे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी साप दिसला की तिथेच मारायचा, अशी लोकांची मानसिकता होती. मात्र, अलीकडे लोक सापाला मारण्यापेक्षा त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात पाठवणे पसंत करतात.
- पवन शर्मा, रॉ संघटना
...

 : मुंबईकरांनो सावधान कारच्या बोनेट,संस्पेशनमध्ये असू शकतो 'साप'
Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, आजपासून तीन दिवस पाणी कपात

या ठिकाणाहून जास्त तक्रारी
१. विद्याविहार, विक्रोळी, कांदिवली, ट्रॉम्बे, वांद्रे
२. भांडुप, मुलुंड, गोदरेज सोसायटी, लोखंडवाला
३. आरे, मुलुंड परिसर
४. खाडी, खारफुटी, नदी, नाले, गटाराला लागून असलेल्या वस्त्या

ही काळजी घ्या
१. कार व्यवस्‍थित लॉक करा
२. गाडी स्वच्छ ठेवा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा
३. बाहेरून फिरून आल्यावर कारची पडताळणी करा

घरात ही घ्या काळजी
१. शौचाला जाण्यापूर्वी एकदा कमोड फ्लश करा
२. ड्रेनेज पाईपलाईनची नीट देखभाल करा
३. उंदरांचा सुळसुळाट थांबवा. घर, परिसर स्वच्छ ठेवा
४. गार्डनिंग करताना गवत दररोज कापा
५. सोसायटीचे कचरा व्यवस्थापन योग्य ठेवा
६. उंदराचे बीळ बुजवा

 : मुंबईकरांनो सावधान कारच्या बोनेट,संस्पेशनमध्ये असू शकतो 'साप'
Mumbai Rain: साध्या हलक्या सरींमुळे मुंबईत वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.