मुंबई : उन्हाळ्यात भटक्या कुत्र्यांना सोसायटी धारकांनी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात एक याचिका हायकोर्टासमोर सुनावणीसाठी आली होती. यामध्ये भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यावरुन सोसायटीच्या सदस्यांमध्ये वाद होता, हा वाद हायकोर्टापर्यंत पोहोचला. या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टानं हे महत्वाचे निर्देश दिले.
न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठानं सोमवारी ही याचिका निकाली काढताना प्राणीप्रेमी याचिकाकर्त्याचा युक्तीवाद मान्य केला. कोर्टानं म्हटलं की, सासोयटीच्या दोन्ही पक्षांमधील वाद सौहार्दपूर्ण पद्धतीनं सोडवण्याची गरज आहे. यामध्ये असं होता कामा नये की, कुत्र्यांना पाणी मिळणार नाही. सोसायटीच्या सदस्याचं हे कर्तव्य असेल की विशेषतः उन्हाळ्याच्या सुरुवातीला प्राण्यांना पुरेसं पाणी उपलब्ध करुन द्यायला हवं. जर असं झालं नाही तर ते प्राण्यांप्रती क्रूरता दाखवल्यासारखं होईल.
खंडपीठानं पुढे म्हटलं की, हे गरजेचं आहे कारण आमची स्पष्ट भूमिका आहे की, अशा प्रकारचा सक्तीचा निर्णय प्राण्यांप्रती क्रूरता केल्यासारखं होईल. याशिवाय सुरक्षा गार्ड किंवा इतर कोणा व्यक्तीद्वारे या प्रकारच्या पर्यायांचा वापर केल्यास जनावरांप्रती क्रूरतेऐवजी त्यांच्याप्रती सद्भावनेत वाढ होईल.
रॉयाले पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या सदस्यांद्वारे एक याचिका दाखल करण्यात आली होती. तर दुसरी याचिका प्राणीप्रेमी आणि त्याच सोसायटीचे रहिवासी पारोमिता पुथरन यांनी दाखल केली होती. या प्रकरणात पुथरन या १८ भटक्या कुत्र्यांची देखभाल करत असताना त्यांना सोसायटीच्या लोकांनी असं करण्यापासून रोखलं होतं. कुत्र्यांना खायला-प्यायला देऊ नये अशी सदस्यांची भूमिका होती. तसेच या सोसायटीचे वॉचमन या कुत्र्यांना काठीनं मारहाण करीत असल्याचा आरोप पुथरन यांनी आपल्या याचिकेत केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.