मुंबईः लॉकडाऊनमधील आर्थिक भार दूर करण्यासाठी ड्रग्स वितरणात उतरलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरला अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) अटक केली आहे. आरोपीकडून अमेरिकेतून कुरिअरद्वारे भारतात आणलेला एक कोटी 62 लाख रुपयांचा उच्च प्रतिचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी या व्यवसायातून दिवसाला एक लाख रुपयांची कमाई करत असल्याचे त्याच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.
यश गिरीश कलानी आणि गुरु दयाल जयस्वाल या दोघांना नुकतीच अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. यश कलानी हा व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. चांगल्या कुटुंबातील असलेला यश याने त्याचे शिक्षण ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे घेतले आहे. सध्या तो वांद्रे येथील कार्टररोड परिसरात कुटुंबियांसोबत राहत होता. त्याची स्वतःची सॉफ्टवेअर सिस्टीम फर्म आहे.
लॉकडाऊन पूर्वी तो स्वतःच्या सेवनासाठी अमेरिकेतून वीड(गांजा) मागवायचा. डार्कने नेटच्या मााध्यमातून मागणी केल्यानंतर ई वॉलेटच्या माध्यमातून हा व्यवहार व्हायचा. त्यानंतर कुरिअरद्वारे त्याला ही ड्रग्स मिळायची. पण लॉकडाऊनमध्ये आर्थिक भार आल्यामुळे त्यांनी सेवनाऐवजी व्यावासायिक वापरासाठी ड्रग्स मागवण्याचा विचार केला. अमेरिकेतील एका व्यक्तीने त्याला यात मदत केली. त्यानंतर तो ड्रग्स घेऊन मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू येथे वितरीत करू लागला. ती ड्रग्स दीड ते साडे तीन हजार रुपये प्रतिग्रॅम विकल्यामुळे त्याला दररोज एक लाख रुपयांचा फायदा होऊ लागला. त्यामुळे त्याने वांद्रे येथील एक बंगलाही ड्रग्स लपवण्यासाठी भाड्याने घेतला. त्याच्या वितरणासाठी त्याने रिक्षा चालक गुरू जयस्वाल याला हाताशी घेतले.
गुरु आणि यश हे दोघेही वांद्रे परिसरात राहत असून ते ड्रग्ज तस्करीत सक्रिय होते. ड्रग्स विक्रीसाठी ते वांद्रे परिसरात येणार आहेत अशी माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती, या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी सायंकाळी तिथे यश आणि गुरु आले होते, यावेळी त्यांच्याकडे प्रत्येकी एक किलो वजनाचे उच्च प्रतीचे विदेशी गांजा सापडला. त्याची किंमत सुमारे 36 लाख रुपये होती. या दोघांच्या चौकशीत त्यांनी वांद्रे येथील पाली गाव येथील बंगल्यात ड्रग्स ठेवल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून आणखीन सात किलो गांजाचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी नऊ किलो गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत 1 कोटी 62 लाख रुपये आहे.
-------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Software engineer went into narcotic business relieve financial burden lockdown
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.