मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात; डोक्याला गंभीर दुखापत, अॅक्सीलेटरवर पाय पडला अन्...

Sameer Khan accident Kurla : कारचालकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sameer Khan accident Kurla
Sameer Khan accident Kurlaesakal
Updated on
Summary

या अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले. तर, निलोफर यांच्या हाताला दुखापत झाली आहे. समीर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Sameer Khan Accident Kurla : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांची मुलगी व त्यांचा जावई मंगळवारी (ता. 17) कुर्ला येथील हॉस्पिटलमध्ये चेकअप करून घरी परतत असताना कारमधील चालकाचा अचानक अॅक्सीलेटरवर पाय पडल्यामुळे कारसोबत काही अंतरापर्यंत फरकटत गेल्याने मलिकांचे जावई समीर खान गंभीर जखमी झाले आहेत.

कारचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

या प्रकरणी कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान (Nilofar Khan) व जावई समीर खान हे मंगळवारी कुर्ला येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअप करून घरी परत जात होते. यावेळी त्यांची कारचालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी (वय ३८) चालवत होता.

Sameer Khan accident Kurla
Ganesh Visarjan : रात्री 12 नंतर साऊंड सिस्टिम लावण्यावरुन पोलिस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने, कराडात तणाव

निलोफर यांच्या हाताला दुखापत

हॉस्पिटलमध्ये चेकअप केल्यानंतर निलोफर आणि समीर हे बाहेर आले. यावेळी गाडीत दोघे पती-पत्नी बसत असताना चालकाकडून अचानक अॅक्सीलेटरवर पाय ठेवला गेल्यामुळे ही कार समीर खान यांना फरकटत नेऊन एचडीआयएल वसाहतीच्या संरक्षण भिंतीजवळ जाऊन आदळली. या अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले. तर, निलोफर यांच्या हाताला दुखापत झाल्याचं कळतंय. समीर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर, कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.