Sachin Tendulkar: सचिनच्या घरातून सिमेंट मिक्सरचा आवाज, शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर आला फोन कॉल; काय आहे प्रकरण?

Sound from Sachin Tendulkar house: सचिन तेंडुलकर यांनी याची दखल घेतली असून डिसोझा यांना त्याबाबत कळवलं आहे.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarEsakal
Updated on

मुंबई- सोशल मीडियावर दिलीप डिसोझा यांच्या दोन पोस्ट व्हायरल होत आहेत. पोस्ट व्हायरल होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यात माजी क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना टॅग करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर यांच्या बांद्रातील घरामधून रात्रीचे ९ वाजल्यानंतरही बांधकामासंबंधी आवाज येत असल्याची तक्रार दिलीप डिसोझा यांनी केली होती. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर यांनी याची दखल घेतली असून डिसोझा यांना त्याबाबत कळवलं आहे.

डिसोझा यांनी काय केली होती पोस्ट

डिसोझा यांनी ५ मे रोजी सोशल मिडियावर प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली होती. यात ते म्हणाले होते की, 'प्रिय सचिन, सध्या रात्रीचे नऊ वाजले आहेत. पण, तुझ्या बांद्रा येथील घरासमोरील सिमेंट मिक्सर अद्याप मोठा आवाज करत आहे. तू तुझ्या घरी काम करणाऱ्या कामगारांना विनंती करु शकतोस का, की त्यांनी कामाची योग्य वेळ निश्चित करुन घ्यावी. धन्यवाद.' डिसोझा यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती.

Sachin Tendulkar
Shriya Pilgaonkar: सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी मुलीला दत्तक घेतलंय? अखेर श्रियानं सोडलं मौन, म्हणाली, "माझं जन्म प्रमाणपत्र..."

डिसोझा यांनी दुसरी पोस्ट!

डिसोझा यांनी ६ मे रोजी दुसरी एक पोस्ट करुन यासंदर्भतील अपडेट दिली आहे. ते म्हणालेत की, 'मला आज दुपारी सचिन तेंडुलकर यांच्या ऑफिसमधून एक नम्र फोन कॉल आला. त्यांनी मला त्यांच्या अडचणी आणि ते आवाज कमी करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच त्यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं.'

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar : सचिन बॅटींगला उतरला तर अमेरिकेचं 5% उत्पादन घटायचं; बराक ओबामांनी सांगितलेला किस्सा!

दिलीप डिसोझा हे एक लेखक आणि पत्रकार आहेत. त्यांनी जेव्हा सचिन संदर्भात पहिली पोस्ट केली होती. त्यावेळी सोशल मीडियावर काहीशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. हा एक पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांनी पोलीस किंवा बीएमसीकडे तक्रार करायला हवी. थेट सचिन तेंडुलकर यांना यात ओढायला नको होतं, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं होतं. मात्र, डिसोझा यांच्या पोस्टला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी त्यांची पोस्ट रिट्विट देखील केली होती. दरम्यान, निर्माण झालेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.