South Mumbai Lok Sabha Result: मराठी माणसाच्या मनात ठाकरेच! सावंतानी केला जाधवांचा पराभव

South mumbai Loksabha 2024 Election Result Arvind Sawat Shivsena ubt winner Yamini Jadhav Shivena shinde | मिलिंद देवरा यांची मदत ही यामिनी जाधव यांना होऊ शकते असं म्हटलं जात होत |
South Mumbai Lok Sabha Result: मराठी माणसाच्या मनात ठाकरेच!  सावंतानी केला जाधवांचा पराभव
South Mumbai Lok Sabha Resultsakal
Updated on

Mumbai Loksabha Result: मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा हक्काचा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मतदार संघ. या ठिकाणी पाहिला गेलो तर गेल्या दोन टर्म पासून असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांचे पारडे जरा जड असल्याचे पाहायला मिळत होते.यातच त्यानी शिंदेंचे उमेदवार यामिनी जाधवांचा पराभव केला आहे.

South Mumbai Lok Sabha Result: मराठी माणसाच्या मनात ठाकरेच!  सावंतानी केला जाधवांचा पराभव
Loksabha Elections 2024: पवार-ठाकरेंना जास्त जागा मिळणार? सकाळच्या राजकीय संपादकांचा अंदाज काय?
South Mumbai Loksabha 2024
South Mumbai Loksabha 2024sakal

दक्षिण मुंबई मतदार संघावर सुरुवातीपासून महायुतीतून भाजप निवडणूक लढण्यास उत्सुक होता. तर मनसेच्या एंट्रीमुळे या ठिकाणी ही जागा मनसेला मिळू शकते अशी ही चर्चा होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी ही जागा आपल्या बाजूला वळवून घेतलीच.

2014 आणि 2019 असे दोन टर्म या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे. तर 2004 आणि 2009 असे दोन टर्म या ठिकाणी काँग्रेसचे मिलिंद देवरा निवडून आले होते. हे मिलिंद देवरा आता राज्यसभेवर खासदार असून सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. यामुळे मिलिंद देवरा यांची मदत ही यामिनी जाधव यांना होऊ शकते असं म्हटलं जात होत. मात्र प्रत्यक्षात असे झालेले दिसून आले नाही.

तर दुसरीकडे हा मतदारसंघ मराठी बहुल असल्याने मनसे फॅक्टर महत्त्वाचा असेल असं म्हटलं जात आहे. अशावेळी अरविंद सावंत यांच्या विरोधात आव्हान जरी मोठं आहे. तरी अरविंद सावंत हे स्वतःच्या जोरावर खासदार होतील अशी ही चर्चा होती. कारण अरविंद सावंत यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. तर दुसरीकडे ठाकरेंविषयी प्रचंड सहानुभूती या मतदारसंघांमध्ये आहे.

या भागामध्ये भूमिगत मेट्रो, भूमिगत पार्किंग यासारखी महत्त्वाची अनेक विकास कामं सुरू आहेत. वाहतूक कोंडीचा या ठिकाणी मोठा प्रश्न आहे. प्रदूषण आणि पर्यावरणाचा प्रश्नही मोठा आहे. हेरिटेज वास्तू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे.

South Mumbai Lok Sabha Result: मराठी माणसाच्या मनात ठाकरेच!  सावंतानी केला जाधवांचा पराभव
Pune Constituency Lok Sabha Election Result : धंगेकरांची जादू चाललीच नाही! पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा विजय
South Mumbai Loksabha 2024
South Mumbai Loksabha 2024

मात्र त्याचे जतन केले जात नाही अशी तक्रार आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कोळीवाडे आहेत. त्यांचेही प्रचंड प्रश्न या ठिकाणी आहेत.

2019 साली या ठिकाणी मिलिंद देवरा यांचा पराभव अरविंद सावंत यांनी केला होता. एक लाख मतांनी त्यांनी हा पराभव केला होता. अरविंद सावंत यांना ४ लाख २१ हजार मतं मिळाली होती. तर मिलिंद देवरा यांना ३ लाख २१ हजार मतं मिळाली होती.

South Mumbai Lok Sabha Result: मराठी माणसाच्या मनात ठाकरेच!  सावंतानी केला जाधवांचा पराभव
Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?
South Mumbai Loksabha 2024
South Mumbai Loksabha 2024

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.