Latest Mumbai News: मुंबई शहरातील नवरात्रोत्सव आणि महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्ट सज्ज झाली आहे. नवरात्रोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो. महालक्ष्मी यात्रा येत्या ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर यादरम्यान होणार आहे. त्यामुळे यात्रा आणि नवरात्रोत्सवासाठी बेस्ट जादा विशेष गाड्या सोडणार आहे.
महालक्ष्मी यात्रेदरम्यान महालक्ष्मीच्या दर्शनासाठी प्रचंड संख्येने येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईच्या उपनगरातून, तसेच भायखळा, महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथून महालक्ष्मीदरम्यान विशेष बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. शहराच्या विविध भागांतून महालक्ष्मी मंदिर मार्गे सोडल्या जाणाऱ्या बस मार्गावरील बसफेऱ्यांमध्येदेखील आवश्यकतेप्रमाणे वाढ करण्यात येणार आहे.
महालक्ष्मी मंदिराला भेट देणारे प्रवासी भायखळा स्थानक व महालक्ष्मी स्थानक येथे उपनगरी रेल्वेने येऊन तेथून वेस्टच्या बसगाड्यांचा लाभ घेतात. ही बाब विचारात घेऊन बेस्ट उपक्रमाच्या जास्तीत जास्त बसगाड्या भायखळा स्थानक, महालक्ष्मी स्थानक ते महालक्ष्मी मंदिर यादरम्यान सोडण्यात येणार आहेत.
३७ जे. मेहला मार्ग ते कुर्ला स्थानकापर्यंत
५७ वाळकेश्वर ते प्रबोधनकार ठाकरे शिवडी
९४१ वडाळा आगार ते ब्रिच कॅन्डी रुग्णालय
ए-६३ भायखळा स्थानक (प) ते बिच कॅन्डी
ए-७७- भायखळा स्थानक (प) ते ब्रिच कॅन्डी
* ए-७७-जादा संत गाडगे महाराज चौक सातरस्ता ते
ब्रिच कॅन्डी रुग्णालय
८३- पं. पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस ते सांताक्रूझ)
ए ३५७ मुंबई सेंट्रल आगार ते शिवाजी नगर आगार
विशेष प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) ते महालक्ष्मी मंदिर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.