वाशी (बातमीदार) : नवी मुंबईत पालिकेच्या वतीने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तयार केलेल्या कोव्हिड हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे. 1200 खाटांची क्षमता असलेले हॉस्पिटल येत्या पाच दिवसात रुग्णांसाठी खुले होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
वाशी येथील एक्झिबेशन सेंटरमध्ये उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाची पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने विक्रमी वेळेमध्ये हे हॉस्पिटल तयार केले आहे. या हॉस्पिटलमध्ये डायलेसिस, कोव्हिड टेस्ट, एक्स-रे या सर्व सुविधा रुग्णांना एकाच छताखाली मिळणार आहेत. या हॉस्पिटलमधील 500 खाटावर रुग्णांना ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आली असून पाचशे खाटा या ऑक्सिजनविरहीत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना आमदार भरत गोगावले, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, कार्यकारी अभियंता सुनील लाड, अरविंद शिंदे, एसबीआय युनियनचे महासचिव जगदीश शृंगारपुरे, शहरप्रमुख विजय माने आदी उपस्थित होते.
एपीएमसीमध्ये कोव्हिड सेंटर
एपीएमसी मधील कोरोना बाधित रुग्णांची धावपळ होऊ नये यासाठी चारशे खाटांचे हॉस्पिटल एपीएमसी च्या आवारात उभ्या करण्याच्या सूचना नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांना दिल्या. हे सेंटर माथाडी भवन समोरील इमारतीमध्ये उभे राहणार आहे. यासाठी महापालिका सर्व सहकार्य करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.