Sanjay Raut ED Custody : संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

संजय राऊत यांना ईडीनं काल तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती.
Sanjay Raut_ED Custody
Sanjay Raut_ED Custody
Updated on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टानं 4 ऑगस्टपर्यंत अर्थात चार दिवसांची ईडीची कोठडी सुनावली. त्यामुळं राऊत यांना आता ईडीच्या कोठडीत रहावं लागणार आहे. पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीनं रविवारी तब्बल ९ तास संजय राऊत यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली.

ईडीचे वकील म्हणाले....

कोर्टात युक्तीवादादरम्यान ईडीनं संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी मागितली. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी वकिलांनी म्हटलं, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. चे माजी संचालक प्रवीण राऊत यांनी एक रुपयाचीही गुंतवणूक केलेली नाही. पण त्यांना ११२ कोटी रुपये मिळाले. चौकशीतून हे समोर आलं आहे की, यांपैकी १.६ कोटी रुपये संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आले.

Sanjay Raut_ED Custody
अशोक चव्हाण भाजपत जाणार का? स्वत: दिलं स्पष्टीकरण; म्हणाले...

या पैशांतून संजय राऊत यांनी अलिबागमधील किहिम बीचवर एक भूखंड विकत घेतला होता. हा भूखंड स्वप्ना पाटकर यांच्या नावे घेण्यात आला, असं चौकशीतून समोर आलं आहे. तसेच प्रवीण राऊत हेच संजय राऊत यांच्यावतीनं व्यवहार करत होते. या प्रकरणी चौकशीसाठी संजय राऊत यांना चार वेळा समन्स बजावण्यात आलं पण ते यांपैकी फक्त एकदाच ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. याकाळात त्यांनी महत्वाचे साक्षीदार आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं या प्रकरणी सखोल चौकशीसाठी संजय राऊत यांना ८ दिवसांची कोठडी देण्यात यावी.

संजय राऊतांचे वकील म्हणाले...

दरम्यान, संजय राऊत यांच्यावतीन वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी युक्तीवाद केला. त्यांनी म्हटलं, संजय राऊतांची अटक ही राजकीय हेतून झाली आहे. त्यांना हृदयासंदर्भात आजार आहे, त्यांच्यावर यासंबंधी शस्त्रक्रिया देखील झालेली आहे. यांसंबंधीची कागदपत्रे यापू्र्वीच कोर्टात सादर करण्यात आली आहेत. त्यामुळं जर संजय राऊत यांना कोठडी द्यायची असेल तर कमीत कमी दिवसांसाठी त्यांना कोठडी देण्यात यावी.

संजय राऊतांना घरचं जेवण, औषधं मिळणार

घरचं जेवण, औषधांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर राऊतांच्या वकीलांनाही सकाळच्यावेळात त्यांना भेटता येणार आहे. तर रात्री साडे दहानंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नसल्याचं ईडीनं कोर्टाला सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()