Mumbai Crime : अवैध देह व्यापारा विरोधात पोलिसांची विशेष मोहीम; 7 कुंटणखान्यातून 33 महिलांची सुटका

अवैध देह व्यापारा विरोधात पोलिसांनी 7 कुंटणखान्यातून 33 महिलांची सुटका केली.
Crime
Crimesakal
Updated on

मुंबई - अवैध देह व्यापारा विरोधात पोलिसांनी 7 कुंटणखान्यातून 33 महिलांची सुटका केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी रात्री गिरगावच्या 7 कुंटणखान्यांवर छापा टाकला. या कारवाईत कुंटणखान्यातील 7 खोल्यांमधून अंदाजे 33 महिलांची सुटका करण्यात आली आहे.

व्हीपी रोडवरील नूर मोहम्मद बेग कंपाउंड इमारतींमध्ये हे कुंटणखाने होते. या प्रकरणी पोलिसांनी 25 आरोपींना अटक केली आहे. तसेच कुंटणखाना चालवणाऱ्यावर पेटा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान या महिलांना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. गिरगाव परिसरात एका शाळेपासून सुमारे 200 मीटर अंतरावर कुंटणखाना चालवला जात होता. पोलिसांनी या कारवाईत लोकांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात वेश्यागृह चालक आणि मालक, याना अटक करण्यात आली असून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.