Diwali Special Train: दसरा अन् दिवाळीसाठी मुंबईहून विशेष ट्रेन, जाणून घ्या २६ फेऱ्यांची माहिती

Diwali Special Train:  दसरा अन् दिवाळीसाठी मुंबईहून विशेष ट्रेन, जाणून घ्या २६ फेऱ्यांची माहिती
sakal
Updated on

मुंबई : सणासुदीच्या हंगामासाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने दसरा, दिवाळी आणि छट सणांसाठी २६ अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक ०७१९६/०७१९५ दादर-काजीपेट साप्ताहिक विशेष गाडीच्या १० सेवा धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०७१९६ साप्ताहिक विशेष गाडी १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी दादर येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १२.५० वाजता काजीपेट येथे पोहोचेल.

Diwali Special Train:  दसरा अन् दिवाळीसाठी मुंबईहून विशेष ट्रेन, जाणून घ्या २६ फेऱ्यांची माहिती
MCAने २७ वर्षांनंतर Irani cup जिंकलेल्या मुंबई संघाला जाहीर केले १ कोटी रुपयांचे बक्षीस

ट्रेन क्रमांक ०७१९५ साप्ताहिक विशेष गाडी १६ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत दर बुधवारी काजीपेट येथून सायंकाळी ५.०५ वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ वाजता पोहोचेल, तसेच ट्रेन क्रमांक ०७१९८ /०७१९७ दादर-काजीपेट साप्ताहिक विशेष-बल्लारशाह मार्गे १६ सेवा धावणार आहेत.

ट्रेन क्रमांक ०७१९८ साप्ताहिक विशेष १३ ऑक्टोबर ते १ डिसेंबरपर्यंत दर रविवारी दादर दुपारी ३.२५ वाजता सुटेल आणि काजीपेट येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०७१९७ साप्ताहिक विशेष गाडी १२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी काजीपेट येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ वाजता पोहोचेल. या गाड्यांचे आरक्षण बुकिंग विशेष शुल्कासह सोमवार(ता. ८) पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उपलब्ध होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.