स्वप्नांचं शहर किंवा स्वप्ननगरी म्हणून मुंबईची ओळख आहे. देशभरातून आणि जगभरातून लोकं या स्वप्ननगरीत आपलं भविष्य अजमावण्यासाठी येत असतात. हे शहर आपल्याला खूप काही शिकवते. संयम, संघर्ष, कष्ट, जिद्द, ध्येय या गोष्टी शिकायला मिळतातच पण वेळेची किंमतही या शहरात आपल्याला कळते.
संयम शिकायचा असेल तर मुंबईकरांकडून शिकायला पाहिजे. मग तो पावसाळ्यातील रस्त्यावरील पाण्यातील प्रवासाचा असो किंवा साधारण दिवसांतील असो. एखाद्या कामासाठी आपल्याला २ मिनीटे उशीर झाला तरी चालत नाही पण मुंबईकर एक रिक्षा मिळण्यासाठी जवळपास अर्धा किलोमीटरच्या रांगेत उभे आहेत. तेही कोणतीही तक्रार आणि घाईगडबड न करता.
रिक्षासाठी रांगेत उभे अलेल्या मुंबईकरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये लोकांची जवळपास अर्धा किलोमीटरची रांग असल्याचं दिसत आहे. यातील कुणीही रांग मोडत नाही किंवा कुणीही कसलीच तक्रार करताना दिसत नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही मुंबईकरांच्या या संयमाला सलाम कराल. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.