Sri Sri Ravi Shankar: मुंबईत ॲन इव्हनिंग ऑफ म्युझिक अँड मेडिटेशन विथ विकसित भारत ॲम्बेसेडर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. एक नागरिक म्हणून निवडणुकीच्या वेळी मतदान करणं हे आपलं कर्तव्य आणि जबाबदारी असल्याचे श्री श्री रविशंकर म्हणाले.
"नेतृत्व चांगले असेल तर लोक चांगले असतात. जशी दूरदृष्टी असते, तशीच निर्मितीही असते. पण त्यासाठी वेळ लागतो. हे सगळं एका रात्रीत घडेल असं तुम्ही गृहीत धरू शकत नाही. समस्या असतील... पण तुम्ही सकारात्मक विचारसरणीने पुढे जा...", असे रविशंकर म्हणाले.
श्री श्री रविशंकर म्हणाले,ते म्हणाले की विकसित भारत प्रथम आपल्यापासून सुरू होतो. आपले मन किती विकसित आहे आणि आपण किती आनंदी आहोत हे महत्त्वाचे आहे. विकासात काय सामील आहे? आनंद...आपण आपल्यात काय विकसित होत आहे याकडे लक्ष देतो. ते काय आहे, आपली जाणीव आहे, तणाव असेल तर चैतन्य विकसित होऊ शकत नाही. जेव्हा तणाव दूर होईल तेव्हाच तुम्ही विकसित व्यक्तिमत्व आणि विकसित भारताचा विचार करू शकता. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल व्हायला हवा.
जगात दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करत आहे. तीनपैकी एक व्यक्ती डिप्रेशनमध्ये जात आहे. या सर्व आजारातून बाहेर पडण्यासाठी ध्यान आणि योगासने आवश्यक असल्याचे रवीशंकर म्हणाले.
यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील उपस्थित होते. "भारत एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. गेल्या 10 वर्षांत देशाची दिशा आणि परिस्थिती चांगल्यासाठी बदलली आहे.. पूर्वी भारत एक कमकुवत राष्ट्र होता... गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेला नवे पंख दिले आहेत. आता भारताकडे आदराने पाहिले जाते..."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.