कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या निकालांसंदर्भात सर्वात मोठा निर्णय...

board results
board results
Updated on

मुंबई : कोरोनाच्या काळात दहावी आणि बारावीचे निकाल कधी लागणार याकडे सारं व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. मात्र आज याबद्दलचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे दहावी व बारावीचे निकाल यंदा अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेले आहेत. पेपर तपासणीसाठी पाठवण्यातील अडचणी अखेर दूर झाल्याने दहावी इतिहास विषयाच्या उत्तरपत्रिका पोस्टमार्फत शाळांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई रेड झोनमध्ये असल्याने शाळांना या उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत पोचवण्यात अडचणी येत आहेत. यावर राज्य शिक्षण मंडळ आणि मुख्याध्यापक मार्ग काढत आहेत.

दहावी, बारावीची पेपर तपासणी होऊन निकाल वेळेत लावता यावा, यासाठी शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये पेपर तपासणीचे काम करण्यास सहज परवानगी मिळत आहे. मात्र रेड झोनमध्ये परवानगी मिळण्यास अडचणी येत आहेत. रेड झोनमधील कंटेन्मेंट झोनमध्ये फारच अडचणी येत आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये जिल्हाधिकारी व आयुक्त परिस्थिती पाहून निर्णय घेत असतात. त्यामुळे येथे सार्वजनिक वाहतूक, प्रवासासाठी पास मिळत नसल्याने शिक्षकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.  

शालेय शिक्षण विभागाकडून पेपर तपासणीसाठी शिक्षकांना परवानगी देण्यासाठी आपण विनंती केली आहे. परंतु काही ठिकाणी परवानगी मिळते तर काही ठिकाणी मिळत नाही. यातून शिक्षण मंडळ पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करत आहे.

राज्य मंडळाकडून सर्व प्रयत्न करण्यात येत असले तरी कंटमेंट झोनमधील पेपर तपासणी राहिल्यास निकाल लावता येणार नाही. सर्व ठिकाणचे निकाल एकाच वेळी लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे पेपर तपासणी आणि इतर कामे 100 टक्के काम पूर्ण झाल्याशिवाय निकालाची अंतिम तारीख जाहीर करता येत नाही.

लॉकडाऊनमुळे दहावी इतिहास विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठवण्यात अडचणी आल्या. अखेर पोस्ट खात्यामार्फत शाळांकडे उत्तरपत्रिका पाठवण्यात आला आहेत. शाळा त्या शिक्षकांपर्यंत तपासणीसाठी पोचवत आहेत. उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालाशी संबंधित कामे विभागीय मंडळामार्फत सुरू आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यामध्ये अडचणी येत आहेत. या अडचणीतून मार्ग काढण्यात येत आहे. पण निकालाबाबत आता काही ठोस सांगता येणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यावर मार्ग काढावा:

"अजूनही परीक्षकांना नियमकांकडे पेपर जमा करण्यासाठी पासेस मिळालेले नाहीत. यामध्येच आता इतिहासाचे पेपर मुख्याध्यापकांना शिक्षकांपर्यंत पोहचवण्यास सांगण्यात आले आहे. पनवेल मध्ये राहणाऱ्या मुख्याध्यापकाला मुंबईतील आपल्या शाळेतून पेपर घेऊन वसईत किंवा कल्याण ला राहणाऱ्या शिक्षकांपर्यंत पेपर कसे पोचवता येतील. हा प्रश्न निर्माण होईल. हे सगळे विभाग रेडझोन आहेत. यावर बोर्डाने आताच घाई न करता लॉकडाउन शिथिल झाल्यावर मार्ग काढावा," असं भाजप शिक्षक आघाडीचे संयोजक अनिल बोरनारे यांनी म्हंटलंय. 

SSC and HSSC results will delay due to corona virus read full story  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.