ST Bank: स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंके ह्या ६२ हजार सभासद व ५० शाखा असलेल्या बँकेत नवं संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर आता पर्यंत ४६६ कोटी रुपयांच्या ठेवी काढल्या, सीडी रेशो ९५.४९ टक्क्यांवर गेला आहे .
आता ही बँक सावरायला उशीर लागणार असून एसटी कर्मचाऱ्यांच्या घामावर उभ्या असलेल्या या बँकेत चाललेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी अनेकांनी करून सुद्धा सरकारने लक्ष दिले नाही. त्या मुळे बँक अडचणीत यायला सरकारचे सहकार खाते जबाबदार असल्याचे स्पष्ट मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.
या प्रकरणी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त को - ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज युनियनने सरकारकडे वारंवार तक्रारी दिल्या होत्या तरीही,सरकार सदावर्ते यांच्या दबावाला बळी पडले असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही असेही त्यांनी म्हंटले आहे.
३० जून २०२३ आधीपर्यंत तसेच नवं संचालक मंडळ बॅंकेवर बसण्याआधी २ हजार ३११ कोटी रुपयांच्या ठेवी बॅंकेत होत्या आता त्यात घट होऊन त्या १८४५ कोटींवर आल्या आहेत. आणि त्या मुळे स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेचा क्रेडिट-डिपाॅझिट रेशो ९५.४९ टक्क्यांवर आल्याने अडचणीत वाढ होणार सर्वसाधारण को-आॅपरेटिव्ह बॅंकेचा सीडी रेशो ७० ते ७५ टक्क्यांमध्ये पाहायला मिळत असतो.पण या बँकेत तो पुढे गेला आहे.
अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बँकेचे व्यवस्थापन सक्षम हवे.पण त्या ठिकाणी चुकीचे अधिकारी नेमले आहेत. व्यवस्थापकीय संचालक तज्ञ असणे आवश्यक आहे.पण एका अननुभवी व्यक्तीची रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनाना हरताळ फासत नेमणूक करण्यात आली आहे. त्याचा फटका सुद्धा बसला आहे.
बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सदावर्तेंचे यांच्या मर्जीतील असल्याने संचालक मंडळ सदस्यांची निर्णय घेण्यात अडचण होत होती. असेही बरगे यांनी म्हंटले आहे.
सीडी रेशोत अजून वाढ झाल्यास सेव्हींग खात्यातील पैसे काढण्यावर निर्बंध येऊ शकतात. अशी भीतीही बरगे यांनी व्यक्त केली आहे.
३०जून २३ रोजी नवे संचालक मंडळ आल्यावर एकूण एकूण कर्जे १७७६ कोटी रुपये होती.आता एकूण कर्जे १७६१ कोटी रुपये आहेत. व्यवहारीक दृष्टया कर्जात वाढ व्हायला हवी होती. पण झालेली नाही.हे ही बँकेच्या दृष्टीने चांगले नाही.
एसटी मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे बँकेचे सभासदत्व आपोआप कमी होते.त्या सोबत राजीनामा दिलेले असे ३ हजार सभासद कमी झाले असून ही सुद्धा बँकेच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. असेही बरगे यांनी म्हंटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.