ST Bank Election : उमेदवारीसाठी सदावर्तेंनी पैसे मागितले; कर्मचारी प्रज्ञा इंगळेंचा आरोप

gunratan sadavarte
gunratan sadavarte
Updated on

मुंबई : एसटी कॉपरेटिव्ह बँकेच्या निवडणूकीमध्ये जसजशी चुरस वाढु लागली आहे. तसतसे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा वाढल्या आहे. यामध्येच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी संघंटनेने एसटी बँकेच्या उमेदवारींसाठी मुंबईत आयोजित केलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी तब्बल ८ ते १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप धाराशीव विभागातील प्रज्ञा इंगळे यांनी केला आहे.

gunratan sadavarte
Sea subway railway : भारतातील पहिला समुद्री भुयारी रेल्वेमार्ग ठाणे खाडीत! हायस्पीड रेल कॉरिडॉरमधील महत्त्वाचा टप्पा

घडलेल्या सर्व प्रकाराचा व्हिडीओ तयार करून त्यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे. मात्र, उमेदवारी मिळाली नसल्याने असा आरोप करण्यात आल्याचे सदावर्ते यांनी सांगितले.

एसटी बँकेची निवडणूक लढवण्यासाठी एसटी कष्टकरी जनसंघातून अर्ज भरला होता. सदावर्तें यांनी बंद दरवाजा आड मुलाखती आयोजीत केल्या होत्या. त्यामध्ये जनसंघाचे कामकाज, तुम्ही केलेले काम, बँक का हवी, बँकेचा महसुल आणि त्यासंबंधीत इतर सर्व प्रश्नांच्या उत्तरासंह उमेदवारांचे बायोडेटा मागवण्यात आला होते. तीन दिवस मुंबईत राहून मुलाखत दिली. त्यामध्ये बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भरपुर पैसे लागणार असल्याने त्यासाठी सुमारे ८ ते १० लाख रूपयांची मागणी केल्याचा खुलासा इंगळे यांनी केला आहे.

gunratan sadavarte
Beed Accident: बीडमध्ये भीषण अपघात; दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू!

या बँकेच्या चक्रव्युहात आजपर्यंत आपण अडकलो आहोत. मान्यता प्राप्त कामगार संघटनेला आपण दोष देत आलो आहे. बँक आणि प्रशासनाच्या माध्यमातून मान्यता प्राप्त संघंटनेने आपल्यावर अन्याय केला आहे. उमेदवारीसाठी जर येवढा पैसा खर्च करण्याची गरज जर असेल तर पैसे देऊन उमेदवारी विकत घेऊ नका, त्यामुळे अपक्ष उमेदवारी म्हणून स्वताची उमेदवारी जाहीर करत असल्याचेही इंगळे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.

सदावर्तेंनी इंगळेंच्या आरोपाला खोडून काढले असून, अनुसूचित जातीसाठी एकच उमेदवारीची जागा होती. त्यासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. यामध्ये इंगळे यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बदनामी करणारा व्हिडीओ केल्याचे सदावर्तेंनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.