ST Bank election : प्रस्थापित एसटी संघटनांचा पराभव का झाला?

Gunratn Sadavrte
Gunratn Sadavrteesakal
Updated on

मुंबई : कोविड आणि संपाचे संकटातून पुर्णपणे बाहेर न पडलेल्या एसटी महामंडळाने नुकतेच ७५ वर्षे पुर्ण केले. एसटी महामंडळाच्या या प्रवासात एसटी कामगारांसाठी आजपर्यंत २२ विविध संघटना अस्तित्वात आल्या. कामगारांसाठीचे न्याय हक्काचे लढेही या संघटनांनी दिले.

मात्र काल, परवा अस्तित्वात आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेने स्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेच्या निवडणूकीत या प्रस्थापित संघटनाना धोबीपछाड दिली आहे.त्यामुळे एसटी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या संघटनावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.

Gunratn Sadavrte
Pune : कुरुलकर प्रकरणात मोठी अपडेट! पॉलिग्राफ अन् व्हॉईस लेअर ॲनॅलिसिस चाचणी...

७० वर्षाची पंरपरा असलेल्या या बँकेवर पांरपारीक पध्दतीने इंटक आणि कामगार संघटनेची सत्ता राहीली आहे.मात्र यावेळी पहिल्यांदा निवडणूकीच्या आखाड्यात उतरलेल्या केवळ वर्षभरापुर्वी स्थापन केलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने नवा इतिहास घडवत प्रस्थापित एसटी संघटनाना धूळ चारली आहे.

त्यामुळे एसटीचा संप चिघळवण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या गुणरत्न सदावर्ते यांची एसटी कामगारांमधील लोकप्रियता अजून ओसरली नसल्याचे स्पष्ट होते.

Gunratn Sadavrte
Ashadhi Ekadashi 2023 Date: आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, तिथी आणि महत्व

प्रस्थापित संघटना अपयशी

गेल्या अनेक वर्षापासून एसटी कामगारांच्या महागाई भत्ता, पगार वाढीपासून अनेक प्रश्न प्रलंबित होते.मात्र हे प्रश्नाची सोडवणूक करण्यात प्रस्थापीत कामगार संघटनांचे नेतृत्व अपयशी ठरले. कामगारांच्या प्रश्नावर व्यापक आंदोलनही झाले नाही. याचा फायदा सदावर्ते,आमदार गोपिचंद पडळकर यांच्या नव्याने स्थापन झालेल्या संघटनानी घेतला.

सातवा वेतन आयोग आणि एसटी विलिनिकरणाच्या मुद्यावरुन पाच महिने संप पुकारला.हा संप यशस्वी झाला नाही मात्र कामगारांच्या प्रश्नावर आम्ही लढत असल्याचे ठसवून देण्यात मात्र गुणरत्न सदावर्ते यशस्वी झाले.त्यामुळे कामगारांनी बँकेच्या निवडणूकीत त्यांच्या पॅनलला एकतर्फी विजय मिळवून दिल्याचे विश्लेषक सांगतात.

सदावर्ते यांची कसोटी

आतापर्यत गुणरत्न सदावर्ते हे प्रस्थापीत कामगार संघटनांच्या नावाने अपयशाचे खापर फोडतो होते. मात्र आता त्यांचे पॅनल जिंकल्याने त्यांना बँक योग्य पध्दतीने चालवून दाखवावी लागेल. त्यामुळे सदावर्ते यांची आता खरी कसोटी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.