Accident News : नगर-कल्याण महामार्गावर एसटी बस अन् कारची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

Accident News : नगर-कल्याण महामार्गावर एसटी बस अन् कारची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू
Updated on

मुंबईः नगर-कल्याण रस्त्यावरील ओतूरजवळ कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने अपघाताची तीव्रता जास्त होती. बस पारनेरहून मुंबईकडे निघाली होती तर कार आळेफाटाकडे जात होती. अपघातामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एसटी बसमधील १५ प्रवाशी जखमी झाले आहेत.

Accident News : नगर-कल्याण महामार्गावर एसटी बस अन् कारची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू
Rohit Sharma : जय शाहांची पुन्हा भविष्यवाणी; म्हणाले, रोहित शर्मांच्या नेतृत्वात भारत WTC अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल

महेश तानाजी गायकवाड,वय 23 वर्षे, व्यवसाय -शिक्षण (डी फार्मसी ), राहणार विद्यानगर,मोहोळ,ता. मोहोळ जि.सोलापूर तर प्रतीक अशोक शिर्के, वय 22 वर्षे, रा. नारळा पैठण, जिल्हा संभाजीनगर, व्यवसाय- शिक्षण डी फार्मसी; अशी अपघातातील मयतांची नावं आहेत.

एसटी बसमधील जखमींना प्राथमिक उपचारासाठी आळेफाटा आणि ओतुर येथे दाखल करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com