मुंबई : रात्रीला जमावबंदी लागू; संपकऱ्यांनी केले आझाद मैदान रिकामे

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्याही रात्रीच्या मुक्कामावर निर्बंध
section 144
section 144Sakal media
Updated on

मुंबई : कोरोना (corona patients) आणि ओमिक्रॉनची रुग्णसंख्या (omicron patients) दिवसेंदिवस मुंबईत वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. जमावबंदीच्या कलम 144 अंतर्गत आता (Section 144 in Mumbai) आझाद मैदान (Azad Maidan empty) सुद्धा रिकामे करण्यात आले आहे. मैदानातील रात्रीचा मुक्कामावर आझाद मैदान पोलिसांनी निर्बंध लावल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांनाही (ST bus employee) रात्र आता इतरत्र काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्यातरी आझाद मैदान रात्रीचे रिकामे झाले आहे.(St bus employee strike issue due to corona restrictions section 144 in Mumbai)

section 144
परळ रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मिठी मारत अश्लील शेरेबाजी

गेल्या 27 ऑक्टोबर पासून राज्यभरात एसटीचा संप सुरू आहे. तर मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनालाही सुमारे 53 दिवस लोटले आहे. विलीनीकरणाचा न्यायालयात प्रलंबित असल्याने एसटी कर्मचार्यांनी विलीनीकरणाशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र ओमायक्रोन च्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी रात्रीचे मैदान, समुद्र किनारे, गार्डन आणि सार्वजनिक ठिकाणांवर निर्बंध लावल्याने आझाद मैदानात आता संपकऱ्यांना रात्रीचा मुक्काम करता येणार नाही.

त्यामुळे आझाद मैदानातील संपकरी एसटी कर्मचारी आता मुंबईतल्या नातेवाईक आणि इतर ठिकाणी राहायला गेले असून, पोलिस प्रशासनाकडून सुद्धा परेल भागात संपकऱ्यांची संभागृहामध्ये व्यवस्था केली असून, विलीनीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे.दैनंदिन सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एसटी कर्मचारी आझाद मैदानात येऊन आपला संप कायम ठेवणार असल्याचे अक्कलकोट आगारातील संपकरी कर्मचारी सविता पवार यांनी सांगितले आहे.

"मनपा आयुक्तांनी रात्रीचे निर्बंध घातल्याने आझाद मैदान रिकामे करावे लागले आहे. आता सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच आझाद मैदान सुरू राहणार आहे. ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मनपाने घेतल्याने संपकऱ्यांची स्वयंस्फूर्तीने मैदान रिकामे करून दिले आहे."

- भूषण बेलनेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.