ST News: एसटी बसला टोलमधून मुक्ती द्यावी ; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

टोल बैठकीत सरकारला एसटीचा विसर
ST Bus News
ST Bus Newsesakal
Updated on

ST News: मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्यात बैठक होऊन त्यात खाजगी वाहनांच्या टोल मुक्ती बाबत विस्तृत चर्चा झाली. शिवाय काही सकारात्मक निर्णय सुद्धा घेण्यात आले.

मात्र राज्याच्या सर्वांगीण विकासात सर्वात मोठा वाटा असलेल्या व राज्यातील खेड्या पाड्यातील गरीब प्रवासी जनतेचे एकमेव साधन असलेल्या एसटीकडून होत असलेल्या गैरवाजवी टोल वसुली बाबतीत साधी चर्चाही झाली नाही. हे दुर्दैवी असून सरकारला गरिबांच्या एसटीचा विसर पडला आहे का ?असा सवाल महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी उपस्थित केला आहे.

एसटीच्या साधारण साडे चौदा ते साडे चौदा हजार गाड्या प्रत्यक्ष रस्त्यावर धावत असून त्यातून दररोज ५२ लाख प्रवासी व दररोज साधारण ६० ते ७० हजार फेऱ्या होत आहेत.रस्तावर प्रत्यक्ष धावणाऱ्या प्रत्येक गाडी मागे एसटीला टोल भरावा लागत असून त्या मुळे एसटी महामंडळाला दरवर्षी सरासरी १६२ ते १६७ कोटी रुपये इतका टोल भरावा लागत आहे.

ST Bus News
ST Commission: महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

विविध कारणांमुळे महामंडळाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एसटीचा संचित तोटा ९००० कोटी रुपयांच्या घरात असून पुरवठादारांची आजही ८५० कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत.अशातच ज्येष्ठ नागरिक महिलांना शासनाने दिलेल्या प्रवासातील सवलतीमुळे व कर्मचाऱ्यांच्या व व्यवस्थापनाच्या अथक प्रयत्नांमुळे महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचले आहे. आता मासिक तोटा कमी झाला असून मासिक तूट फक्त २४ कोटी रुपये इतकी खाली आली आहे. एसटीला टोल मधून मुक्ती दिल्यास नफ्याच्या एकदम जवळ पोहचू शकते. व त्या मुळे साहजिकच राज्यातील गरीब प्रवासी जनतेला अजून चांगल्या सवलती देता येतील व दिलासा मिळू शकेल. या शिवाय महामंडळा समोरील आर्थिक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतील. त्या मुळे पुढील बैठकीत सरकारने एसटी बसला लागणाऱ्या टोल वसुली बाबतीत सुद्धा फेर विचार करून टोल मधून एसटीला पूर्णतः मुक्ती द्यावी अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

ST Bus News
ST Accident News : माळशेज घाटात भरधाव ट्रकने दिली एसटी बसला धडक ; 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.