ST Bus : सदावर्तेंच्या संपाच्या घोषणेकडे एसटी कामगारांची पाठ; राज्यात १०० टक्के एसटी डेपो सुरू

सदावर्ते यांच्या बंदच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी अक्षरशः झिडकारले. सोमवारी १०० टक्के वाहतुक सुरु होती.
gunratn sadavarte
gunratn sadavarte sakal
Updated on

मुंबई - एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्य़े विलिनीकरणासह सातव्या वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष ॲड. जयश्री पाटील यांनी सोमवार (ता .६) पासून कामबंद करून संपाचा इशारा दिला होता. मात्र, ॲड .सदावर्ते दाम्पत्याच्या संपाच्या घोषणेला राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र सोमवारी निर्माण झाले होते. एकही डेपोतील कर्मचारी रस्त्यावर उतरले नसून, राज्यातील एसटीची सेवा १०० टक्के सुरळीत असल्याने सदावर्ते यांच्या संपाची गोची झाली.

विलीनीकरण आणि सातवा वेतन शिस्त आवेदन पद्धती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कष्टकरी जनसंघाने सोमवारपासून राज्यात कामबंद आंदोलनाची नोटीस एसटी महामंडळाला दिली होती. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीची राज्यातील वाहतूक विस्कळित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. सोमवारी एसटी प्रवाशांना प्रवासासाठी अडचणी निर्माण होईल अशी स्थिती असताना परंतु एसटी सेवा सुरळीत धावत होती. यापूर्वी सुद्धा एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातव्या वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी तब्बल सहा महिने सदावर्ते यांनी संप पुकारला होता. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना यापैकी एकही मागणी पूर्ण न होता. रिकाम्या हाताने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हावे लागले होते.

सदावर्ते यांच्या बंदच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी अक्षरशः झिडकारले. सोमवारी १०० टक्के वाहतुक सुरु होती. आपली अवहेलना झाकण्यासाठी सदावर्तेंनी उद्योगमंत्र्यांची बैठक लावून घेउन फक्त आश्वासनावर आंदोलन मागे घेतल्याची घोषणा त्यांना करावी लागली. खरेतर सदावर्ते हे केवळ स्वतःच्या सवंग प्रसिद्धीसाठी कर्मचाऱ्यांचा वापर करीत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले आहेत. सहा महीन्याचा संप असेल किंवा बॅंक ताब्यात दिल्यानंतर बॅंकेचे झालेले वाटोळे असेल हे लपलेले नाही.

- संदीप शिंदे, अध्यक्ष,एसटी कामगार संघटना

gunratn sadavarte
ST Bus : मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे कष्टकरी जनसंघाच्या संपाला कळंबच्या आगारातील कर्मचाऱ्यांची नकार घंटा

एसटी महामंडळात एस.टी. कष्टकरी जनसंघाने आज पासून जी काम बंद आंदोलनाची नोटीस दिली होती. त्याला कामगारांचा अजिबात पाठिंबा दिसत नव्हता व तसे एसटी व्यवस्थापनाच्या सुद्धा लक्षात आले होते. आंदोलनाचा फज्जा उडाला. तरीही निव्वळ सदावर्ते यांची प्रतिमा उजळण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी शासन स्तरावर बैठक घेत सदावर्ते यांची सुपारी घेतल्याचे चित्र दिसले.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.