मुंबई : एसटी महामंडळातील (ST bus) जुन्या भंगार खिळखिळ्या गाड्यांच्या ऐवजी लवकरच आता रस्त्यावर नवीन गाड्या धावताना (new bus) दिसणार असून, प्रवाशांचा प्रवास सुखकारक( travelers happy journey) होणार आहे. त्यासाठी खासगी भाडेतत्वावर (rent) 500 तर एसटी महामंडळाच्या मालकीच्या (ST depot own buses) 700 अशा एकूण 1200 बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यापैकी 500 बसेसची निविदा (tender) प्रक्रिया सोमवार पासून सुरू होणार आहे. (ST bus-travelers happy journey-rent-ST depot own buses-tender-nss91)
एसटी महामंडळातील सुमारे 3500 बसेसचे आयुर्मान संपले आहे तर मालवाहतुकीसाठी सुद्धा बसेसचे रूपांतरण केले जात आहे. त्याशिवाय नादुरुस्त बसेस असल्याने प्रवासी बसेसची संख्या घटली आहे. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात साध्या बसेस वाढविणे आवश्यक आहे. शिवाय दरवर्षी आयुर्मान संपणाऱ्या गाड्यांच्या ठिकाणी नवीन गाड्या घेण्याची प्रक्रिया सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये पार पडली नसून एकही नवीन गाडी एसटीच्या ताफ्यात उतरली नाही.
त्यामुळे आता नवीन साध्या गाड्या घेणे आवश्यक आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून, बीएस 6 बनावटीच्या या बसेस राहणार आहे. राज्यभरातील 7 विभागाकरिता या खासगी भाडेतत्वावरील 500 बसेसचा वापर केला जाणार आहे. तर 7 वर्षांकरिता या बसेसचा एसटीच्या ताफ्यात वापर केला जाणार असल्याचे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.