काल जल्लोष करणारे आंदोलनकर्ते एसटी कर्मचारी आज आक्रमक का बनले ?

एसटी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गुरूवारी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात जल्लोष केला होता. मग त्यानंतरही हे आंदोलन का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आंदोलकांना कोणीतरी हेतूपुरस्सर चिथवल्याची शंका उपस्थित होत आहे.
st employees protesting at silver oak
st employees protesting at silver oakgoogle
Updated on

मुंबई : गेले पाच महिने आझाद मैदानात आंदोलनाला बसलेले ‘राज्य परिवहन मंडळा’चे (ST) कर्मचारी शुक्रवारी आक्रमक झाले. दुपारी ३ वाजता कर्मचाऱ्यांच्या संतप्त जमावाने घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर धुडगूस घातला. यावेळी त्यांनी पवार यांच्या घराच्या दिशेने चपला फेकून मारल्या. एकाएकी आलेल्या जमावाला थोपवताना पोलीस प्रशासनाचीही तारांबळ उडाली. पोलीस प्रशासनाला संभाव्य आंदोलनाची कल्पना का आली नाही आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर जल्लोष करणारे आंदोलक अचानक आक्रमक का बनले, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

st employees protesting at silver oak
सुप्रिया सुळेंनी मानले मुंबई पोलिसांचे आभार, म्हणाल्या..

आंदोलकांना सामोरे जाण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे हजर झाल्या होत्या. शांततेच्या मार्गाने चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले; मात्र तरीही आंदोलकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे चर्चा न करता आपले आई-वडील व मुलीची सुरक्षितता पाहण्यासाठी त्या घरात गेल्या.

st employees protesting at silver oak
'माझी आई आणि मुलगी घरात..' सुप्रिया सुळे थेट संतप्त कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात

आंदोलकांना अडवण्यासाठी पवार यांच्या घराबाहेर फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. आंदोलनाची तीव्रता एवढी होती की अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील स्वत: आंदोलकांना आवरण्यासाठी हजर होते. साधारण तासभर आंदोलन झाल्यानंतर सर्व आंदोलकांना वाहनांमध्ये बसवून पुन्हा आझाद मैदानात नेण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गुरूवारी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात जल्लोष केला होता. मग त्यानंतरही हे आंदोलन का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आंदोलकांना कोणीतरी हेतूपुरस्सर चिथवल्याची शंका उपस्थित होत आहे.

न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत; मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे.

…………….

police security
police securitygoogle

गृह विभागावर प्रश्नचिन्ह


आझाद मैदानातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी त्यांची गुप्त यंत्रणा तैनात केली आहे; मात्र, गुरुवारी न्यायालयाच्या निर्णयानंतरही आंदोलक शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ बंगल्यावर धडकणार यासंदर्भात पोलिसांच्या गुप्त यंत्रणेला माहिती मिळाली नव्हती का, एसटी कर्मचारी एवढ्या मोठ्या संख्येने पवार यांच्या बंगल्यावर पोहोचले कसे, पोलिसांची गुप्त यंत्रणा गाफील कशी राहिली, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.