एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढलं, रात्रभरात घडामोडींना वेग

ST worker strike
ST worker strike
Updated on

एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत थेट शरद पवार यांच्या मुंबईतीन निवासस्थानी हल्ला चढवला. मोठ्या प्रमाणात जमावाने एकत्र येत चप्पल आणि दगडफेक केली. वेळीच पोलिसांनी परिस्थिती हातात आणण्याचा प्रयत्न केला. (Attack on Sharad Pawar House)

मात्र, शरद पवार यांच्या घराव थेट हल्ला झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. आंदोलनकर्त्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी सदावर्तेंसह १०४ जणांना अटक झालीय. (ST Worker Strike)

दरम्यान, रात्रभऱात मोठ्या प्रमाणात घडामोडींना वेग आलाय. पोलिसांनी आझाद मैदानावरून आंदोलनकर्त्यांना हुसकावल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता आंदोलनकर्ते छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आले आहेत. याठिकाणी त्यांनी ठिय्या दिलाय. (ST Worker Protest on Silver Oak)

ST worker strike
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

आधी नायर हॉस्पिटल, मग जे.जे रुग्णालय...मध्यरात्रीत घडामोडींना वेग!

आधी नायर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना नेण्यात आलं. यानंतर त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं. यानंतर त्यांना ११ वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे. रात्री त्यांना पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतलं.

ST worker strike
Silver Oak : पारसी लोकांचा शांत निवांत परिसर ते सत्ताकेंद्र

यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असून गुणरत्न सदावर्ते व एस. टी.कर्मचारी यांनी पवारांच्या घरात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात कलम 142, 143, 145, 147, 149, 332, 353, 333, 448, 452, 107, 120 (ब), भा.द.वी. r/w क्रिमिनल अमेंडमेन्ट कलम 7,महाराष्ट्र पोलीस ॲक्ट कलम 37 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते आणि अन्य 103 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.