मुंबई : कोरोनासारख्या संसर्गजन्य माहामारीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने आपली सेवा सुरू ठेवली आहे. त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्ट्रीने सर्व सुविधा पुरवण्याचा गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहातच कर्मचाऱ्यांना खालीच झोपावे लागत असून, परळ डेपोमध्ये निकृष्ट जेवण आणि उरण डेपोतील विश्रांतीगृहात घाणीचे साम्राज्य असून एसटीने जेवणाची सोय केली नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
नक्की वाचा : कोरोना योद्धांना भारतीय हवाई दलाकडून अनोखी मानवंदना
राज्यात 24 मार्च पासून लाॅकडाऊन आहे. त्यामुळे शासकिय यंत्रणा कोलमडू नये यासाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी बस सुविधा सुरू आहे. मुंबई, ठाणे, कुर्ला, पालघर येथील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन दैनंदिन अत्यावश्यक सेवा देत आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्ट्रीने कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याचे कर्मचारी नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगत आहे.
नुकतेच कुर्ला नेहरू नगर आगारातील यांत्रिकी कर्मचारी कोरोना बाधीत असल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर ही एसटी महामंडळ प्रशासनाने, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा कोणताही आढावा घेतला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे दिवसेंदिवस अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळच सुरू आहे. परळ आगारातील कर्मचाऱ्यांनी निकृष्ठ जेवण मिळत असल्याच्या एसटी प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या, मात्र, त्याची दखल कोणी घेत नसल्याचे एसटी कर्मचारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगत आहेत. त्यामूळे भविष्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न एसटी कर्मचारी आणि कर्मचारी संघटना उपस्थित करत आहे.
माझ्याकडे अजूनपर्यंत कर्मचाऱ्यांची एकही तक्रार आली नाही. पण अशी परिस्थिती असल्यास त्यासंदर्भात माहिती घेतो, त्यानंतर सांगता येईल
- शेखर चन्ने, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळमुंबई सेंट्रल आगारात विश्रामगृहासाठी तीन खोल्या आहेत. त्यातील एका जुन्या खोलीत ढेकन आहेत. त्यासाठी पेस्ट कंट्रोल सुद्धा केले. मात्र ढेकन कमी होत नाही.
- सुनील पवार, डेपो मॅनेजर, मुंबई सेंट्रल आगार
st staff restroom is in bad condition, read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.