मुंबई- बिग बॉस विनर आणि कॉमेडियन मुनव्वर फारूकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. एका स्टॅडअप कॉमेडी शोमध्ये कोकणी माणसाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मुनव्वर फारूकी कुठे असेल कळवा, असं म्हणत मनसेचे थेट इशाराच दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.
स्टॅडअप कॉमेडी शोमध्ये बोलताना मुनव्वर फारुकीने कोकणी माणूस लोकांना चु** बनवत असतात असं म्हटलं होतं. यावर मनसेने आक्षेप घेतला आहे. मुनव्वर फारूकीच्या वक्तव्याने कोकणी माणूस दुखावला आहे. त्यामुळे मनसे मुनव्वर फारुकीचा बंदोबस्त करणार आहे. मनसेकडून मराठी माणसांना आवाहन आहे. मुनावर फारुखी कुठे असेल याविषयी मनसैनिकांना कळवा, असं मनसे कामगार नेते राज पारटे म्हणाले आहेत.