मुंबईः मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना सदस्य एकमेकांसोबत भिडले असल्याचं समोर आलं आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ऑडिओ क्लिपवरुन हा राडा झाला आहे. स्थायी समितीत या विषयाचा हरकतीचा मुद्दा घेऊ न दिल्यानं भाजप सदस्यांनी घोषणाबाजी केली आहे.
या राड्याच्या आधी कंत्राटदार धमकी प्रकरण तसेच स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांना बोलू न देणे यावरुन भाजपने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले होतं.
मुंबई महापालिका स्थायी समितीत शुक्रवारी झालेली बैठकीतील मुद्द्यांवरून भाजपने आंदोलन पुकारले. स्थायी समिती अध्यक्षांच्या सभागृहाबाहेर भाजपकडून निषेध करण्यात आला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनासमोर भाजप आणि शिवसेना नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकले. यावेळी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.
— sakalmedia (@SakalMediaNews) December 4, 2020
भाजप गटनेते प्रभाकर शिंदे आणि इतर सदस्य सहभागी झाले होते. पालिका कंत्राटदारास फोनवरून कथित धमकी दिल्याची ऑडिओ क्लीप वायरल झाली. त्यावरून बैठकीत हरकतीचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला असता वापरलेल्या भाषेचा शिंदे यांनी निषेध केला.
प्रभाकर शिंदे यांना अध्यक्षांच्या दालनात येऊन चर्चा करण्यांची विनंती केली. मात्र त्यांनी दाद दिली नाही असे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप जाधव यांच्यावर करण्यात आला आहे. मे यश कॉर्पोरेशनचे रमेश सोलंकी यांनी यशवंत जाधवांविरोधात पोलिसांत धाव घेतली. रमेश सोलंकी यांनी या तक्रारीचं पत्र मुंबई पालिका आयुक्त आणि मुंबई पोलिसांना दिलंय.
या तक्रारीच्या पत्रात रमेश सोलंकी यांनी मर्जीतल्या कंत्राटदाराला नेमण्यासाठी जाधव हे धमकी देत असल्याचा आरोप केला. तसंच कंत्राटदाराला कंत्राट मागे घेण्यासाठी दबाब टाकत असल्याचीही त्यांची तक्रार आहे. यासोबतच त्यांची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि कंत्राटदार यांचं संभाषण आहे.
----------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Standing Committee yashwant jadhav viral audio clip bjp shivsena Members fight
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.