नवी मुंबई : गेले अनेक वर्षे रखडलेल्या सिडकोच्या मेट्रोरेल्वेला (cidco metro railway) सुरु करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिले. शिंदे आज नवी मुंबईतील (Navi mumbai) दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात शिंदे यांनी सिडको महामंडळातर्फे (cidco authorities) विकसित करण्यात येत असलेली नेरुळ जेट्टी, मेट्रो, सेंटर ऑफ एक्सलन्स, उलवे येथील भूमिपुत्र भवन, गृहनिर्माण प्रकल्प, न्हावाशेवा-शीवडी सागरी सेतू आदी प्रकल्पांची पाहणी केली. या दरम्यान मेट्रो सुरु करण्याबाबत अंमलबजावणीच्या उपस्थित अधिकाऱ्यांना शिंदे यांनी सूचना दिल्या. (Start navi mumbai cidco railway order by urban development minister eknath shinde )
सिडकोकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनांद्वारे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील अनेक नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाल्याचे शिंदे यांनी दौऱ्यात पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. कोविड योद्ध्यांच्या सन्मानार्थ सिडकोने नुकत्याच सादर केलेल्या गृहनिर्माण योजनेचाही त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. त्याचप्रमाणे नवी मुंबईचे २०५० पर्यंतचे पाणी पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन सिडकोतर्फे करण्यात आले असून नवी मुंबई पालिकेने याबाबत सकारात्मक विचार करावे असे सल्लाही शिंदे यांनी दिला.
त्याचप्रमाणे नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर एस्कलेटरची सुविधा करावी असे निर्देश देखील त्यांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना दिले. सिडकोच्या नेरूळ जेट्टी प्रकल्पाच्या पाहणीनंतर सिडकोतर्फे करण्यात आलेल्या सादरीकरणामध्ये आगामी व प्रगतीपथावरील विविध प्रकल्पांबद्दल शिंदे यांना माहिती देण्यात आली. या दरम्यान शिंदे यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना विविध प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या.
महामेट्रोने नवी मुंबई मेट्रो लाईन १ कार्यान्वित करण्याकरीता देण्यात आलेली अंतिम तारीख २ वेळा चुकवली असल्याने प्रकल्प लांबणीवर पडला आहे. या अनुषंगाने शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याच्या प्रकल्पांतर्गत, सिडकोकडून नवी मुंबईतील नेरुळ येथे प्रवासी जलवाहतूक टर्मिनल अंतर्गत नेरुळ जेट्टी उभारण्यात आली आहे. लवकरच नेरुळ जेट्टी येथून मुंबईतील भाऊचा धक्का व मांडवा दरम्यान जल वाहतूक सेवा सुरू होणार आहे. या सेवांचे परिचालन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून करण्यात येणार आहे.
या जलप्रवासामुळे नवी मुंबई ते दक्षिण मुंबई आणि कोकण दरम्यानच्या प्रवासाचे अंतर लक्षणीरीत्या कमी होणार आहे. सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे साकारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क प्रकल्पांतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स हे अत्याधुनिक दर्जाचे, फिफा मानकांचे अनुपालन करणारे फुटबॉल स्टेडियम साकारण्यात येत आहे. नेरुळ येथील आगरी-कोळी भवनच्या धर्तीवर उलवे येथे सिडकोकडून भूमिपुत्र भवन साकारण्यात येत आहे. नवी मुंबईतील मुळचे रहिवासी असणाऱ्या आगरी-कोळी बांधवांना आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करता यावे याकरिता भूमिपुत्र भवनाच्या रूपाने हक्काचे व्यासपीठ लाभणार असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
नगर विकासास आवश्यक अशा पायाभूत सुविधा, परिवहन, गृहनिर्माण इ. क्षेत्रांमध्ये सिडकोने आजवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरातील गृहनिर्माण योजनेबरोबरच सिडकोकडून आता जलवाहतूक, मेट्रो असे नवी मुंबईची परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करणारे प्रकल्प साकारण्यात येत आहेत. सेंटर ऑफ एक्सलन्स फुटबॉल स्टेडियम सज्ज झाल्यावर नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात मानाचे स्थान प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे साकारण्यात आलेला पालघर मुख्यालय हा प्रकल्प आधुनिक काळातील देशातील वास्तुशास्राचा उत्कृष्ट नमुना आहे. स्थानिकांना त्यांचा वारसा जतन करण्यासाठी भुमिपूत्र भवन उपलब्ध करून देऊन सिडकोने सामाजिक जाणही ठेवली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.